AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना सुट्टीचा असाही सदुपयोग; शिक्षकांनी पालटले जीर्ण झालेल्या शाळेचे रुपडे

शिक्षकांची धडपड पाहून ग्रामस्थ देखील मदतीला धावून आले. त्याचबरोबर ग्रामपंचायतीनेही हातभार लावला. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नामुळे शाळेचे रुपडे पालटून गेले आणि शाळा केवळ सुंदरच नव्हे तर डिजिटल झाली. (Such a good use of the Corona holiday; The teachers changed the look of the dilapidated school)

कोरोना सुट्टीचा असाही सदुपयोग; शिक्षकांनी पालटले जीर्ण झालेल्या शाळेचे रुपडे
कोरोना सुट्टीचा असाही सदुपयोग; शिक्षकांनी पालटले जीर्ण झालेल्या शाळेचे रुपडे
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jul 11, 2021 | 2:15 PM
Share

मनमाड, रईस शेख, टीव्ही 9 मराठी : कोरोनामुळे सलग दुसरे शैक्षणिक वर्ष शाळा बंद आहेत. ऑनलाईनच्या माध्यमातून शाळा सुरु आहेत. शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मात्र नांदगाव तालुक्यातील चांदोरे या छोट्याशा गावातील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी कोरोना काळातील सुट्टीचा सदुपयोग केल्याचे पहायला मिळाले. कोरोना सुट्टीमध्ये जीर्ण झालेल्या शाळेची दुरुस्ती करून तिला नवे स्वरूप देण्याचे काम शिक्षक आणि ग्रामस्थांनी केले आहे. यासाठी शिक्षकांनी आपसात वर्गणी गोळा केली. शिक्षकांची धडपड पाहून ग्रामस्थ देखील मदतीला धावून आले. त्याचबरोबर ग्रामपंचायतीनेही हातभार लावला. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नामुळे शाळेचे रुपडे पालटून गेले आणि शाळा केवळ सुंदरच नव्हे तर डिजिटल झाली. (Such a good use of the Corona holiday; The teachers changed the look of the dilapidated school)

पडक्या शाळेचे सुंदर शाळेत रुपांतर

शिक्षकांनी मोडकळीस आलेल्या शाळेची स्वखर्चाने केवळ दुरुस्तीची केली नाही तर शाळेची रंगरंगोटी करून भिंतीवर आकर्षक अशी चित्रेही काढली. शिक्षकांची धडपड पाहून ग्रामस्थ देखील मदतीला धावून आले तर ग्रामपंचायत आणि नोकरी निमित्त बाहेरगावी गेलेल्या भूमीपुत्रांनी देखील मदत केली. मुख्यध्यापक, शिक्षक, ग्रामस्थ, ग्रामपंचायत आणि नोकरदार भूमीपुत्र या सर्वांचे प्रयत्न आणि एकजुटीमुळे पडक्या शाळेचे रूपांतर आज सुंदर शाळेत झाले आहे.

49 वर्षे जुनी आहे शाळा

नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील चांदोरे नावाचे सुमारे 3 हजार लोकसंख्या असलेले छोटेसे गाव असून येथे गावालगत जिल्हा परिषदेची शाळा असून त्यात गोरगरीब, आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसोबत आदिवासी समाजाचे विद्यार्थी इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण घेतात. शाळा 49 वर्षे जुनी असल्याने ती मोडकळीस येऊन धोकादायक झाली होती. त्यामुळे ग्रामस्थ आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यास घाबरत होते. अखेर शिक्षकांनी शाळेला नवे रूप देण्याचा विडा उचलून आपसात वर्गणी गोळा केली. काम जास्त तर पैसे कमी अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर शिक्षकांनी ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांना मदत करण्याचे आवाहन केले.

ग्रामपंचायतीकडूनही शाळेला निधी

शिक्षक आणि ग्रामस्थांची धडपड पाहून सरपंच व ग्रामपंचायत सदस्य देखील मदतीस सरसावले आणि त्यांनी 14 व्या वित्त आयोगाअंतर्गत आलेला निधी शाळेला दिला. तिकडे नोकरी निमित्त बाहेर गावी गेलेल्या भूमीपुत्रांना शाळेच्या दुरुस्तीबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी देखील मदतीचा हात पुढे केला. शिक्षक, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत या सर्वांच्या एकजुटीमुळे एकेकाळी मोडकळीस आलेल्या शाळेचे केवळ रुपडेच पालटले नाही तर ती मोठ्या खाजगी शाळेच्या बरोबरीची डिजिटल शाळा देखील झाली. शाळेचे नवे रूप पाहून विद्यार्थी शाळेत येण्यास उत्सुक झाले असून शाळा कधी सुरू होईल याची ते आतुरतेने वाट पाहत आहे. सर्वांनी वेळेचा सदुपयोग केला तर नक्कीच परिस्थिती बदलू शकते, हे या शाळेतील शिक्षक आणि त्यांना मदत करणाऱ्या ग्रामस्थांनी दाखवून दिले. (Such a good use of the Corona holiday; The teachers changed the look of the dilapidated school)

इतर बातम्या

दहा तासांच्या प्रतिक्षेनंतर एकनाथ शिंदे जळगाव महापालिकेत आले; मात्र नगरसेवकांच्या पदरी निराशाच

GAIL Recruitment 2021: गेल (इंडिया) लिमिटेडमध्ये 220 सरकारी नोकर्‍या; 5 ऑगस्टपर्यंत करा ऑनलाईन अर्ज

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...