AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहा तासांच्या प्रतिक्षेनंतर एकनाथ शिंदे जळगाव महापालिकेत आले; मात्र नगरसेवकांच्या पदरी निराशाच

महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले. तसेच आयुक्तांनी प्रशासनातर्फे स्वागत केले. (After waiting for ten hours, Eknath Shinde came to Jalgaon Municipal Corporation; But no announcement of any donation)

दहा तासांच्या प्रतिक्षेनंतर एकनाथ शिंदे जळगाव महापालिकेत आले; मात्र नगरसेवकांच्या पदरी निराशाच
दहा तासांच्या प्रतिक्षेनंतर एकनाथ शिंदे जळगाव महापालिकेत आले; मात्र नगरसेवकांच्या पदरी निराशाच
| Edited By: | Updated on: Jul 11, 2021 | 12:35 AM
Share

जळगाव : महापालिकेत सत्तांतर झाले आणि शिवसेनेची सत्ता आली. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची पहिलीच भेट असल्याने, पदरात मोठा निधी पडेल अशी अपेक्षा नगरसेवकांना होती. मात्र तब्बल दहा तास प्रतिक्षा करून भेट दिलेल्या नगरविकास मंत्र्यांनी निधीची कोणतीही घोषणा न केल्यामुळे नगरसेवकांच्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत. जळगाव महापालिकेत भेट देऊन ते विकास कामांचा आढावा घेणार होते. एकनाथ शिंदे यांचा जळगाव महापालिका भेटीचा कार्यक्रम सकाळी 11 वाजता होता. परंतु जळगाव महापालिकेस भेट न देता शिंदे यांनी थेट आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली. त्यानंतर ते थेट पाचोरा येथे रवाना झाले. (After waiting for ten hours, Eknath Shinde came to Jalgaon Municipal Corporation; But no announcement of any donation)

तब्बल दहा तासानंतर एकनाथ शिंदे महापालिकेत दाखल

जळगाव महापालिकेत भेट न दिल्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आले होते. मग त्यांनी पाचोरा येथून विमानतळावर जाताना धावती भेट द्यावी यासाठी प्रयत्न सुरू झाले आणि त्याला यश आले. तब्बल दहा तासानंतर रात्री आठ वाजता ते जळगाव महापालिकेत आले. यावेळी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले. तसेच आयुक्तांनी प्रशासनातर्फे स्वागत केले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील आमदार किशोर पाटील, आमदार चिमणराव पाटील आदी उपस्थित होते.

गुलाबराव पाटील यांच्याकडून निधीची मागणी

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महापालिकेस विकास कामासाठी निधी देण्याची मागणी केली. तसेच महापालिकेवर असलेल्या कर्जाची माहिती दिली. विकासासाठी तातडीने निधी घोषित करावा अशी अपेक्षाही पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जळगाव महापालिकेत सत्तांतर झाले आहे. त्यामुळे विकासाची जबाबदारी अधिक वाढली आहे. जळगावच्या विकासासाठी भरीव निधी देण्यात येईल. त्यासाठी अधिकाऱ्यांसोबत मुंबईत बैठक घेण्यात येईल व प्रश्न सोडविण्यात येईल, असे आश्वासन दिले. मात्र कोणतीही निधी देण्याची घोषणा त्यांनी केली नाही. (After waiting for ten hours, Eknath Shinde came to Jalgaon Municipal Corporation; But no announcement of any donation)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात, सुभाष देसाईंनी पुण्यात जाऊन केली पाहणी

पालिकेचे वरातीमागून घोडे, चौकशी अहवाल ठेवण्यासाठी बंदिस्त व्हेरिएबल सेगमेंटची खरेदी करणार; स्थायी समितीत मंजुरीसाठी प्रस्ताव

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.