छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात, सुभाष देसाईंनी पुण्यात जाऊन केली पाहणी

देशातील सर्वात उंच अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पुण्यात जाऊन या पुतळ्याची नुकतीच पाहणी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात, सुभाष देसाईंनी पुण्यात जाऊन केली पाहणी
shivaji maharaj

औरंगाबाद : देशातील सर्वात उंच अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पुण्यात जाऊन या पुतळ्याची नुकतीच पाहणी केली आहे. या पुतळ्याची औरंगाबाद शहरातील क्रांतीचौक येथे स्थापना करण्यात येणार आहे. शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पूर्णाकृती पुतळा हा आजवरचा देशातील सर्वाधिक उंच असा पुतळा असेल. (work of Chhatrapati Shivaji Maharaj statue is in final stage which is to be established in Aurangabad)

पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात

शहरातील क्रांतीचौकात शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा स्थापन केला जाणार आहे. या पुतळ्याची पाहणी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पुण्यात जाऊन केली आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मिळतेय. शिवाजी महाराजांचा हा पुतळा देशातील आजवरचा सर्वात उंच पुतळा असून त्याची लवकरच स्थापना केली जाणार आहे. 6 टन वजन, 21 फूट उंच, 22 फूट लांबी तसेच 31 फूट उंच चौथरा असेलला भव्य दिव्य असा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल.

दरम्यान, मागिल कित्येक दिवसांपासून शिवजी महाराजांच्या पुतळ्याचे काम सुरु आहे. क्रांतीचौकातील महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा पाहण्यासाठी सर्व नागरिक उत्सुक आहेत. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री सुभाष देसाई यांनी खास पुण्यात जाऊन या पुतळ्याच्या कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. तसेच पुतळ्याचे काम कधीपर्यंत पूर्ण होऊ शकेल याची चाचपणी केली. सुभाष देसाई यांच्या या पाहणीमुळे लकवरच शहरात शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची स्थापना होईल असा अंदाज लावला जात आहे.

इतर बातम्या :

मुंडे भगिनी समर्थकांमधील नाराजीचे लोण आता अहमदनगरपर्यंत, पाथर्डी पंचायत समितीच्या सभापतींचा राजीनामा

समझोताच करायचा नसेल, सोबत राहून पाठीवर सुराच खुपसायचा असेल तर… : नाना पटोले

Video | उंची 20 इंच, वजन 26 किलो, ‘राणी’ला पाहण्यासाठी लोकांची गर्दी, जगातील सर्वांत लहान गाय असल्याचा दावा

(work of Chhatrapati Shivaji Maharaj statue is in final stage which is to be established in Aurangabad)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI