Video Igtarpuri Rain : मुसळधार पावसाने इगतपुरी शहर जलमय, घरांमध्ये शिरले पाणी, शहराला तलावाचे स्वरूप

अशा अपत्तीजनक प्रसंगी एकही लोकप्रतिनिधी नगरसेवक जनतेच्या मदतीला पुढे आले नाही. त्यामुळं नागरिकांनी याबाबत रोष व्यक्त केला. येणाऱ्या निवडणुकीत बदल घडविण्याचा विचार केलाय. काही भागात मतदान न करण्याचा निश्चयही केला आहे.

Video Igtarpuri Rain : मुसळधार पावसाने इगतपुरी शहर जलमय, घरांमध्ये शिरले पाणी, शहराला तलावाचे स्वरूप
मुसळधार पावसाने इगतपुरी शहर जलमय
Follow us
| Updated on: Jul 09, 2022 | 10:26 PM

इगतपुरी : पावसाचा जोर वाढून मुसळधार पावसाने शहरातील नाले गटार तुडुंब ओसंडून वाहू लागले. अनेक भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने (water seeps into houses) नागरिकांची एकच तारांबळ उडाली. बाजारपेठेतील दुकानांत व रस्त्यावर ओसंडून वाहणाऱ्या पाण्याने व कोसळणाऱ्या पावसाने अनेक भागाचा संपर्क तुटला. नगर परिषद आरोग्य विभाग व आपत्ती व्यावस्थापनेच्या (Disaster Management) पथकांनी भर पावसात मदत कार्य सुरू केले. नागरिकांना घराबाहेर पडू न दिल्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरात पाणी पुरवठ्याच्या पाईप लाईनच्या अर्धवट कामामुळे ठिकठिकाणी खोदकाम सुरू आहे. खड्ड्यात पाणी साचल्याने चिखल व डबक्यांचा पादचारींना अंदाज आला नाही. त्यामुळं अनेक महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना दुखापत होत आहे. नगर परिषद (Municipal Council) विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. शहरात तलावाचे स्वरूप आल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

अनेक घरांमध्ये शिरले पाणी

अशा अपत्तीजनक प्रसंगी एकही लोकप्रतिनिधी नगरसेवक जनतेच्या मदतीला पुढे आले नाही. त्यामुळं नागरिकांनी याबाबत रोष व्यक्त केला. येणाऱ्या निवडणुकीत बदल घडविण्याचा विचार केलाय. काही भागात मतदान न करण्याचा निश्चयही केला आहे. शहराच्या बकालीकरणाला राजकीय पुढाऱ्यांना जबाबदार धरले आहे. शहराची अशीच परिस्थिती राहिल्याने शहराची लोकसंख्या घटत आहे. विकासही खुंटला असल्याचे बोलले जात आहे. नगर परिषद आरोग्य विभागाने पावसाळ्याअगोदर नालेसफाई केली नाही. त्यामुळं शहरात तुंबापुरी होऊन घरांमध्ये पाणी शिरल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही नागरिक केवळ सोशल मीडियावर आपले मतांतर व्यक्त करून अफवा पसरवित नागरिकांच्या भावना दुखावत आहेत.

हे सुद्धा वाचा

नगर परिषदेचा मनमानी कारभार

इगतपुरी तालुक्याला पावसाने झोडपले आहे. रात्रभरापासून जोरदार पाऊस सुरू आहे. इगतपुरी शहरात पाणी तुंबलं आहे. नगरपरिषद आणि पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांच्या नियोजन शून्य मनमानी कारभारामुळे इगतपुरी शहरातील खालची पेठ, वसंत पवार नगर, धोबी गल्ली, लोया रोड इत्यादी परिसरातील घरात नाली, गटार आणि रस्त्यावरील पाणी शिरलं आहे. खालची पेठ येथील घरात गुडघाभर पाणी साचले. त्याच घरामध्ये चार महिन्याचे, 1 वर्षाचे अशी दोन लहान मूल देखील आहेत. घरातील संपूर्ण संसार अस्ताव्यस्त झाला आहे. हीच परिस्थिती शहरातील इतर भागात आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.