AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Girish Mahajan: मुख्यमंत्री होणार का? गिरीश महाजन यांनी एका वाक्यात सर्वच सांगून टाकलं

Girish Mahajan on CM Post: गिरीश महाजन हे सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला होता. त्यावर आता गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय आहे महाजन यांच्या मनात?

Girish Mahajan: मुख्यमंत्री होणार का? गिरीश महाजन यांनी एका वाक्यात सर्वच सांगून टाकलं
मुख्यमंत्री होणार का?, गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया
| Updated on: Jul 12, 2026 | 11:29 AM
Share

पवन येवले, प्रतिनिधी, टीव्ही ९ मराठी : राज्यात अचानक मुख्यमंत्री पदाच्या चर्चांना वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाणार असल्याचा दावा उद्धव ठाकरे गोटातून करण्यात येत आहे. फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे पुढचे मुख्यमंत्री असतील असा दावा काल खासदार संजय राऊत यांनी केला होता. गिरीश महाजन मुख्यमंत्री होणार नसल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले होते. तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन हे मुख्यमंत्री पदाच्या(Girish Mahajan on Eknath Khadse) शर्यतीत असल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली होती. आता या सर्व चर्चांवर दस्तूरखुद्द गिरीश महाजन यांनीच मोठा खुलासा केला आहे.

गिरीश महाजन मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत?

या सर्व दाव्यांवर गिरीश महाजन यांनी सकाळीच माध्यमांना खास प्रतिक्रिया दिली. मी कधीच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नव्हतो आणि नाही, असे म्हणत त्यांनी विषयावर एका वाक्यात पडदा टाकला. तर त्यांना अमित शाह यांनी फोन केला होता हे त्यांनाच माहीत. मला माहीत नाही. त्यांची थेट हॉट लाईन असेल. ते मागे तसं म्हणालेही होते, असा चिमटा त्यांनी एकनाथ खडसे यांना काढला.

तर बच्चू कडू यांच्यावरही त्यांनी तिरकस बाण सोडला. बच्चू कडू मोठे नेते आहेत आमच्या महायुतीचे आहेत ते रोज काही ना काही बोलत असतात. त्यांना झाले असेल काही. हे असे काही लोक आहेत की त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं, अशी प्रतिक्रिया महाजन यांनी दिली.

राऊतांच्या जि‍भेला हाड नाही

जय राऊत यांना फार उत्तर देण्याची गरज नाही. त्यांच्या जिभेला हाड नाही मनुफॅक्चरिंग फॉल्ट आहे, असा टोला महाजन यांनी लगावला. कोणते गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर दिसत आहे तुम्ही तर शोधून द्या काहीतरी बोलतात स्वतः काही बोंब पडत नाही आपल्या मागे आता कोणी राहिले नाही आपण काय केले एखादा काम त्यांचं सांगण्यासारखे आहे का काहीच नाही. कुणालाही काही बोलतात पंतप्रधानांपासून सरन्यायाधीशांपासून इलेक्शन कमिशन फडणवीस आणि शिंदे यांना वाटेल ते बोलत असतात हा एकच गुणधर्म त्यांचा आहे. यापुढे हम दो हमारे दो असे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्यांच्या पक्षात असतील, असा टोला महाजन यांनी हाणला. तर विनायक राऊत यांची सून गिरजा राऊत यांनी केलेल्या आरोपांची पारदर्शक चौकशी होईल असे महाजन यांनी स्पष्ट केले.

नाशिक नगरसेवक फुटीवर काय प्रतिक्रिया?

नाशिकमधील ठाकरे सेनेचे नगरसेवक फुटण्याच्या चर्चांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. मला याची कल्पना नाही. संजय राऊत काय सगळेच विचारले आहेत त्यांच्याकडे कोण राहिला आहे .महापालिका नाही 17 पैकी एक आमदार त्यांचा निवडून आला नाही नगरपालिका त्यांची नाही त्यांचं काय आहे भविष्यात काही दिसत नाही. दोन चार पाच टक्के भविष्य दिसत नाही. पक्ष बुडवला हे काफी आहे, असे महाजन म्हणाले.

कितीही वाद असले तरी खडसे खरं सांगतील

26/11 मुंबईवरील हल्ला झाला त्यावेळी मी रस्त्यावरच होतो .इतके लोक मारले माझं रक्त सळसळत होतं. ही वास्तुस्थिती आहे. एकनाथ खडसेन माझं किती वाद असले तरी ते खरं सांगतील, अशी प्रतिक्रिया टीकाकारांना महाजन यांनी दिली.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा