AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीएनजी दरवाढी विरोधात युवक राष्ट्रवादीचं अनोखं आंदोलन, आंदोलनाची होतेय चर्चा…

पेट्रोल-डिझेल तुलनेत सीएनजी दराची वाढ पाहता नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत असून त्यातच सीएनजीचे वाढते दर बघून राष्ट्रवादीने निदर्शनं केली आहे.

सीएनजी दरवाढी विरोधात युवक राष्ट्रवादीचं अनोखं आंदोलन, आंदोलनाची होतेय चर्चा...
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Oct 05, 2022 | 2:50 PM
Share

नाशिक : सतत वाढणाऱ्या पेट्रोल-डीझेलच्या (Petrol Diesel) किमतीला पर्याय म्हणून वाहनधारक नैसर्गिक वायू कडे (CNG) वळलेले आहे. त्यातच नैसर्गिक वायूच्या किमतीत म्हणजे सीएनजी आणि पीएनजी ही झपाट्याने वाढत असल्याने त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले आहे. सीएनजी पंपावरील ग्राहकांना काळी आपट्याची पाने वाटप करत उपहासात्मक आंदोलन करण्यात आले आहे. दसऱ्याच्या दिवशी धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली आहे. त्याचे प्रतीक म्हणून सोने वाटपाची परंपरा आहे. त्यासाठी आपट्याची पाने वाटून आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे.

पेट्रोल-डिझेल तुलनेत सीएनजी दराची वाढ पाहता नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत असून त्यातच सीएनजी चे वाढते दर बघून राष्ट्रवादीने निदर्शनं केली आहे.

महागाईमुळे नागरिकांचे सर्वच सणावर पाणी फिरलेले असतांना मोदी सरकारन नवनवीन माध्यमातून जनतेला महागाईच्या खाईमध्ये ढकलत आहे.

पेट्रोल-डिझेलच्या सतत वाढणाऱ्या किमतीला पर्याय म्हणून सरकारने नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या वाहनांचा पर्याय दिला आहे. त्यानुसार वाहनधारक त्याकडे वळाले सुद्धा होते.

परंतु सद्यस्थितीत डीझेलच्या किमतीपेक्षा सीएनजीची किमती जास्त असल्याने वाहनधारक आपल्या कपाळावर हात मारून घेत असल्याचे राष्ट्रवादीने दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे.

याशिवाय महागाई गेल्या काही वर्षांतील सर्वोच्च स्थराला पोहोचली आहे. सर्व वस्तूंचे दर गगनाला भिडलेले असताना यामध्ये भर पडलीयं ती म्हणजे सीएनजी गॅसची.

नाशिक शहरात सीएनएजीच्या दरात प्रति किलोमागे चार रुपयांची मोठी वाढ करण्यात आलीयं. यामुळेच आता सीएनजी ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सीएनजी गॅस दरात मोदी सरकारकडून सततची दर वाढ करण्यात येत आहे. सीएनजी गॅस दर वाढत असल्याने वाहन चालकांना मोठा फटका याचा सहन करावा लागतोयं.

९२ रुपये वरून नाशिकमध्ये आता सीएनजी गॅस ९६ रुपयांवर पोहचला असल्याने वाहनधारक संतप्त झाल्याचे चित्र बघायला मिळते आहे. यावेळी बाळा निगळ, जय कोतवाल, विशाल डोके, निलेश भंदुरे, सागर बेदरकर, राहुल कमानकर, अमोल नाईक, डॉ.संदीप चव्हाण आदींसह मोठया संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

नैसर्गिक वायूच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असून राज्याचे मुख्यमंत्री सत्कार स्वीकारण्यात व विविध सणांच्या आनंदोत्सवात व्यस्त आहे. वाढती महागाई, अतिवृष्टीने झालेले पिक नुकसान, शेतकऱ्यांची नुकसान भरपाई व नागरिकांच्या इतर जिवंत प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे.- अंबादास खैरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस, नाशिक

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.