सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी रस्सीखेच, राष्ट्रवादी अनुभवी आणि खास व्यक्तीला संधी देणार?

| Updated on: May 30, 2021 | 10:15 AM

सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी जोरदार रस्सीखेच असलेली पाहायला मिळतीय. माजी आमदार सुरेश लाड, राष्ट्रवादीचे नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील आणि नामदेव भगत यांच्यात सिडकोच्या अध्यक्षपदासाठी जोरदार स्पर्धा आहे. (Navi Mumbai Cidco President lobbing in NCP)

सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी रस्सीखेच, राष्ट्रवादी अनुभवी आणि खास व्यक्तीला संधी देणार?
सिडको अध्यक्षपदासाठी चुरस...
Follow us on

नवी मुंबई : सिडको महामंडळाच्या (Cidco President) अध्यक्षपदासाठी जोरदार रस्सीखेच असलेली पाहायला मिळतीय. माजी आमदार सुरेश लाड (Suresh Lad), राष्ट्रवादीचे नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील (Prashant Patil) आणि नामदेव भगत (Namdev Bhagat) यांच्यात सिडकोच्या अध्यक्षपदासाठी जोरदार स्पर्धा आहे. सिडकोच्या अध्यक्ष पदावर राष्ट्रवादी कुणाची वर्णी लावणार, हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे. (Navi Mumbai Cidco President lobbing in NCP)

माजी आमदार सुरेश लाड यांच्या नावावर एकमत?

सिडको हे राज्यातील एक श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखले जाते. आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना वसाहत, मेट्रो, उरण नेरुळ रेल्वे, जेएनपीटी विस्तार, स्मार्ट सिटी यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याच्या कामी लागली आहे. त्यामुळे हे महामंडळ राष्ट्रवादीकडे जाणार असून सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी माजी आमदार सुरेश लाड यांच्या नावावर एकमत होणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.

सुरेश लाड यांच्या नियुक्तीला सेनेचा पाठिंबा

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे माजी आमदार सुरेश लाड यांचे संबंध असल्याने त्यांच्या नियुक्त्याला विरोध नसल्याचे समजते. त्यामुळे पनवेल आणि उरण नवी मुंबईत या भागात राष्ट्रवादीची ताकद नसल्याने माजी आमदार सुरेश लाड यांना सिडको अध्यक्ष करून त्या भागात पक्षाला ताकद देण्याची रणनीती आखली असून तसेच लाड यांच्या पक्ष संघटनेच्या अनुभव लक्षात घेता त्यांना जबाबदारी दिली जाणार आहे, अशी माहिती आहे.

लाट यांना अजित पवार-तटकरे यांचं पाठबळ

माजी आमदार सुरेश लाड विरुद्ध आमदार महेंद्र थोरवे असा राजकीय संघर्ष सध्या कर्जतमध्ये सुरु आहे. आमदार थोरवे यांनी रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्यावर सडकून टीका केली. त्यामुळे खासदार तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नोंद घेतल्याची समजते त्यामुळे तटकरे आणि अजित पवार यांनी लाड राजकीय ताकद देण्याकरिता सिडको महामंडळ वर्णी लागावी यासाठी जोरदार प्रत्यन करताना दिसून आहे.

नवी मुंबई येथील सेनेचे नेते नामदेव भगत यांनी सिडको संचालक मिळण्याकरिता सेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी पक्ष प्रवेश केला त्यामुळे ते सुद्धा आपली वर्णी लागावी यासाठी जोरदार प्रयत्न दिसून येत आहे.

प्रशांत पाटील यांच्या नावाची चर्चा

तसेच राष्ट्रवादीचे नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील हे सुद्धा सिडको अध्यक्ष पदासाठी नांवाची चर्चा सुरु आहे. आगरी समाजाचे नुकतेच प्रवेश केलेले भाजप नेते तसेच गणेश नाईक यांना उत्तर देण्याकरिता त्यांच्या नावाची चर्चा सध्या सुरु आहे. येत्या 15 जून पर्यत महामंडळ नियुक्त होणार असून महाविकास आघाडी सरकार भक्कमपणे आहे, असा संदेश देण्याकरिता नियुक्ता केला जाणार आहेत.

(Navi Mumbai Cidco President lobbing in NCP)

हे ही वाचा :

100 टक्के लसीकरण हाच कोरोनावरील प्रभावी उपाय, पालिकेने लवकरात लवकर लस खरेदी करावी : गणेश नाईक

म्युकोरमायकोसिसचा वेगाने फैलाव, रुग्णांना मोफत उपचार द्या, भाजप आमदाराची मागणी