म्युकोरमायकोसिसचा वेगाने फैलाव, रुग्णांना मोफत उपचार द्या, भाजप आमदाराची मागणी

नवी मुंबईतील खाजगी हॉस्पिटलमध्ये सामान्य नागरिकांना यावर उपचार मोफत करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती केली. (Give free treatment for Mucormycosis Patinet)

म्युकोरमायकोसिसचा वेगाने फैलाव, रुग्णांना मोफत उपचार द्या, भाजप आमदाराची मागणी
म्युकरमायकोसिस

नवी मुंबई : कोरोनाइतक्याच प्राणघातक असलेल्या म्युकोरमायकोसिस (mucormycosis) आजाराचा राज्यभरात वेगाने फैलाव होत आहे. या आजारावर मोफत उपचार केले जावेत, अशी मागणी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे. याबाबत नुकतंच त्यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नवी मुंबईतील खाजगी हॉस्पिटलमध्ये सामान्य नागरिकांना यावर उपचार मोफत करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती केली. (Give free treatment for Mucormycosis Patinet demand BJP MLA Manda Mhatre)

नवी मुंबई पालिका आयुक्तांकडून सकारात्मक प्रतिसाद

मंदा म्हात्रेंच्या या मागणीवर नवी मुंबई पालिका आयुक्तांनीही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. म्युकोरमायकोसिसवर महापालिकेमार्फत मोफत उपचार करु. तसेच नेरूळ येथील डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटल आणि वाशी येथील हिरानंदानी फोर्टिस हॉस्पिटल येथे म्युकरमायकोसीस या आजारावर मोफत उपचार करण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी दिले. तसेच यादरम्यान इतर विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

मंदा म्हात्रे आणि आयुक्तांच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

  • आमदार निधीतून उपलब्ध करण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्लांट लवकरात लवकर उभारणे
  • नवी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागात उद्यान अधिकारी नसल्याने कनिष्ठ अधिकाऱ्यांवर कामाचा ताण पडतो, याकरिता उद्यान अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे.
  • नवी मुंबईतील महावितरण वीज कर्मचारी, शिक्षणासाठी बाहेरगावी जाणाऱ्या विद्यार्थी, बँकिंग कर्मचारी यांनाही लसीकरण मोहिमेत समावेश करण्यात येणे.
  • नवी मुंबईतील सर्व पत्रकारांनाही अपोलो हॉस्पिटलच्या माध्यमातून लसीकरण व्यवस्था देण्यात येणे.
  • वाशी सेक्टर-17 येथील नाल्यावर झाकण टाकून तेथे सुशोभीकरण करणे
  • करावे गाव मधील अनेक नागरिकांना देण्यात आलेले वाढीव मालमत्ता कर कमी करण्यात येणे
  • एपीएमसी मार्केटमध्ये स्वच्छता गृहे बांधण्याकरिता जागा उपलब्ध करून देण्यात येणे
  • हॉस्पिटल मधून निघणाऱ्या कचऱ्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावणे
  • एपीएमसी मार्केटमध्ये स्वच्छता करणे

म्युकरमायकोसिसवरील औषधे आणि उपचार महाग 

कोरोनासारख्या महाभयंकर आजाराने थैमान घातले असताना या आजारावर नियंत्रण ठेवता आले असले तरी कोरोनामुळे निर्माण झालेल्या डोळ्यांचा आजार म्युकरमायकोसिस या आजाराने रुग्ण त्रस्त झाले आहेत. या आजारावरील उपचाराकरिता लागणारी औषधे महागडी असल्याने गरीब आणि सामान्य रुग्णांना परवडणारी नाहीत. त्यामुळे या आजारावरील औषधे आणि उपचार मोफत केल्यास रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होईल, अशी मागणी मंदा म्हात्रेंनी केली.

24×7 सेवा देणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा लसीकरणामध्ये समावेश करा

तसेच म्युकरमायकोसिस रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. याकरिता नवी मुंबईतील खाजगी हॉस्पिटलमध्येही या आजाराचे उपचार मोफत करण्याची मागणी यावेळी करण्यात आलेली आहे. नवी मुंबईतील महावितरणचे वीज कर्मचारी कोव्हीड काळात 24 तास अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असतात. बँकिंग कर्मचारीही सर्व दिवस सेवा बजावत आहेत. संचारबंदी लागू असतानाही पत्रकार बांधव त्यांचे काम चोख बजावत आहेत. अशा 24×7 सेवा देणाऱ्या कोरोना योद्ध्यांचाही लसीकरणामध्ये समावेश करावा, असेही त्या म्हणाल्या. आयुक्तांनीही सकारात्मक प्रतिसाद देत सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.  (Give free treatment for Mucormycosis Patinet demand BJP MLA Manda Mhatre)

संबंधित बातम्या :

कोरोनापेक्षा जास्त प्राणघातक असलेल्या म्युकोरमायकोसिसचा राज्यात पहिला बळी; डोंबिवलीत वृद्धाचा मृत्यू

सावधान, धोका वाढतोय; ठाण्यात आढळला म्युकोरमायकोसिसचा पहिला रुग्ण

उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात म्युकोरमायकोसिसचा झपाट्याने संसर्ग, नव्या संकटाची चाहुल?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI