नवी मुंबईत भाजपाचा शिवसेना आणि राष्ट्रवादीला दे धक्का! पक्षाच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांसह पक्ष प्रवेश

ज्यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे त्यांना शेवटपर्यंत पश्चाताप करण्याची पाळी येणार नाही त्यांनी घेतलेला निर्णय हा योग्य असेल असे भाजप नेत्या चित्रा वाघ यावेळी म्हटले आहे.

नवी मुंबईत भाजपाचा शिवसेना आणि राष्ट्रवादीला दे धक्का! पक्षाच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांसह पक्ष प्रवेश
नवी मुंबईत भाजपाचा शिवसेना आणि राष्ट्रवादीला दे धक्का!
Follow us
| Updated on: Jul 15, 2021 | 9:50 PM

नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरदार दणका दिला असून दिघा आणि तुर्भे येथील या दोन पक्षाच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे या भागातील भाजपाची ताकद वाढली असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडासाफ झाला आहे. लोकनेते आमदार गणेश नाईक, भाजपाच्या प्रदेश महिला उपाध्यक्षा चित्रा वाघ, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर सुधाकर सोनवणे, भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हातात घेतला. (BJP’s push to Shiv Sena and NCP in Navi Mumbai, Party entry with activists of important office bearers of the party)

गेली वीस वर्षे शिवसेनेमध्ये कार्यरत

दिघा येथील शिवसेनेचे विभागप्रमुख सुभाष काळे, गेल्या पंधरा वर्षांपासून शिवसेनेचे काम करणारे शाखाप्रमुख केशव चव्हाण, दिघा येथील शिवसेना युवा विभाग अधिकारी सचिन लोंढे, समाजसेविका श्वेता काळे, जय लहुजी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मातंग समाजासाठी महाराष्ट्रभर काम करणारे योगेश शिंदे, असंघटित कामगारांच्या हितासाठी काम करणारे राष्ट्रवादीचे तुर्भे तालुका अध्यक्ष बाळकृष्ण खोपडे, माजी नगरसेवक प्रल्हाद शेलटकर शाखाप्रमुख बसवराज गडीवडार शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी मल्लेश पुजारी, राष्ट्रवादीचे तुर्भे तालुका उपाध्यक्ष शिवाजी शिंदे, तुर्भे तालुका कार्याध्यक्ष नियाज शेख या सर्वांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह लोकनेते आमदार नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला.

गुंडांना घाबरु नका असा गणेश नाईकांचा पक्षप्रवेश करणाऱ्यांना सल्ला

ज्यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे त्यांना शेवटपर्यंत पश्चाताप करण्याची पाळी येणार नाही त्यांनी घेतलेला निर्णय हा योग्य असेल असे भाजप नेत्या चित्रा वाघ यावेळी म्हटले आहे. तसेच नवी मुंबई पालिकेच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व 111 ठिकाणी भाजपाचे उमेदवार जिंकून आणावेत असे आवाहनही त्यांनी केले. नवी मुंबई महापालिकेतील सत्तेचा लोककल्याणासाठी वापर केला असे सांगून लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी गुंडांना घाबरू नका. आपल्याकडे असलेले नैतिकतेचे शस्त्र सर्वात मोठे आहे, असा सल्ला उपस्थित कार्यकर्त्यांना दिला. लोकनेते नाईक म्हणाले, भाजपात आलेल्या सर्वांना आपुलकीची वागणूक मिळेल. पालिका निवडणुकांच्या दृष्टीने सावध रहा. जनतेचे हित साधण्यासाठी महापालिकेची सत्ता प्राप्त करूया, सल्ला आमदार नाईक यांनी यावेळी नव्याने भाजपात दाखल झालेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिला आहे. (BJP’s push to Shiv Sena and NCP in Navi Mumbai, Party entry with activists of important office bearers of the party)

इतर बातम्या

मुंबई APMC मार्केटमधील मसाला आणि धान्य बाजार उद्या बंद 

ड्रग्जच्या तस्करीसाठी कॉल सेंटर मॉड्युलचा वापर; मुंबईत आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.