शरद पवार राष्ट्रपती होणार यात तथ्य नाही, या बातम्या पेरण्यात आल्यात : नवाब मलिक

"राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रपती होणार या बातम्या निराधार आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही. या बातम्या पेरण्यात आल्या आहेत," अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.

शरद पवार राष्ट्रपती होणार यात तथ्य नाही, या बातम्या पेरण्यात आल्यात : नवाब मलिक

मुंबई : “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रपती होणार या बातम्या निराधार आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही. या बातम्या पेरण्यात आल्या आहेत,” अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. माध्यमांमधून शरद पवार राष्ट्रपती होणार असल्याच्या बातम्या येत होत्या. त्यावर आज (15 जुलै) नवाब मलिक यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे (Nawab Malik comment on speculations of Sharad Pawar as President candidate).

नवाब मलिक म्हणाले, “सध्या राष्ट्रपती पदाची निवडणूक नाही. 5 राज्यांच्या निवडणूक निकालानंतर काय परिस्थिती असेल ते स्पष्ट होईल. मात्र पक्षांतर्गत राष्ट्रपती पदाबाबत कधीही चर्चा झाली नाही किंवा इतर पक्षांसोबतही चर्चा झालेली नाही. या बातम्यांमध्ये तथ्य नाही”

“ट्विटरवर अंकुश आणून लोकांचा बोलण्याचा अधिकार काढून घेणे योग्य नाही”

केंद्र सरकारच्या माध्यमातून ट्विटरवर अंकुश आणण्याचे काम सुरू झाले आहेत. लोकांचा बोलण्याचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न होतोय हे योग्य नाही, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी नवाब मलिक यांनी केली. मलिक म्हणाले, “ट्विटर हे असे माध्यम होते ज्यावर लोकं निर्भिडपणे आपली बाजू मांडत होते. सत्य परिस्थिती लोकांसमोर आणत होते. मात्र, देशभरात इतर माध्यमांवर अंकुश ठेवण्याचे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून होत आहे.”

नवाब मलिक म्हणाले, “ट्विटर हे एकच माध्यम राहिले होते जिथे लोकं स्वतःची निर्भिड बाजू मांडत होते. एखादा व्यक्ती चुकीची माहिती टाकत असेल किंवा खोटी अफवा पसरवत असेल तर आयटी सेलच्या विविध कलमान्वये त्यांच्यावर कारवाई होत होती. ट्विटरवर कुणाचा अंकुश नव्हता, परंतु आता केंद्र सरकार थेट ट्विटरवर अंकुश ठेवणार आहेत,” असं सांगत नवाब मलिक यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा :

‘दाढीवाला चोर कोण’ त्याचं नांव आशिष शेलारांनी सांगितले पाहिजे : नवाब मलिक

नानांची भूमिका मविआला सुरुंग लावणारी, अजित पवार संतापले, थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचं भागभांडवल 700 कोटी होणार : नवाब मलिक

व्हिडीओ पाहा :

Nawab Malik comment on speculations of Sharad Pawar as President candidate

Published On - 8:53 pm, Thu, 15 July 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI