मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये ‘सिमरन’ फळाची दमदार एन्ट्री, खरेदीसाठी ग्राहकांची बाजारात गर्दी

सिमरन फळ चवीला गोड असल्याने खरेदीसाठी खवय्यांची चांगलीच गर्दी फळ बाजारात पाहायला मिळत आहे. हे फळ सुरवातीला हिरवळ आणि पिवळसर असते. पिकल्यावर ते लाल रंगाचे होत असून ग्राहकांचे लक्ष वेधत आहे. तर हे फळ शिमला येथून येत असल्याने त्याला 'सिमरन' म्हणून ओळखले जाते.

मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये 'सिमरन' फळाची दमदार एन्ट्री, खरेदीसाठी ग्राहकांची बाजारात गर्दी
Simran Fruit

नवी मुंबई : मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिमाचलच्या ‘सिमरन’ फळाची आवक सुरु झाली आहे. ग्राहकांना “सिमरन” फळाचे खास आकर्षण असल्याने फळ खरेदीसाठी फळ बाजारात गर्दी पहायला मिळत आहे.

सिमरन फळ

उत्तरप्रदेशातील पावसाळी आंबे संपल्यावर फळ बाजारात सिमरन फळाचा हंगाम सुरु होतो. या फळाचा हंगाम सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत असतो. हे फळ दिसायला साधारणतः टोमॅटो फळासारखे असून ग्राहकांचे मात्र खास आकर्षण ठरले आहे.

सिमरन फळ चवीला गोड असल्याने खरेदीसाठी खवय्यांची चांगलीच गर्दी फळ बाजारात पाहायला मिळत आहे. हे फळ सुरवातीला हिरवळ आणि पिवळसर असते. पिकल्यावर ते लाल रंगाचे होत असून ग्राहकांचे लक्ष वेधत आहे. तर हे फळ शिमला येथून येत असल्याने त्याला ‘सिमरन’ म्हणून ओळखले जाते.

शिवाय, या फळात जवळपास अनेक जीवनसत्व असल्याचेही असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोरोना काळात रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी या फळाला लोक पसंती देत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. मात्र, काही मोजक्या व्यापाऱ्यांकडे या फळाची आवक येत असल्याने खरेदीसाठी ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागते.

हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथून हे फळ येत असून मुंबई एपीएमसी बाजारात साधारण 1 ते 2 हजार बॉक्सची आवक होत आहे. या फळाचा एक बॉक्स अंदाजे बारा ते चौदा किलोचा असतो. घाऊक बाजारात त्याच्या एका पेटीला दर्जानुसार 1200 ते 1800 रुपये भाव मिळत आहे. आपल्याला हे फळ चाखायचे असल्यास आपण देखील एपीएमसी मार्केटमध्ये खरेदी करु शकता.

संबंधित बातम्या :

मुंबई बाजार समितीत भाजीपाल्याला अच्छे दिन, दरात दुपटीनं वाढ, शेतकऱ्यांना दिलासा

मुंबई APMC मसाला मार्केटमध्ये बदामाच्या दरात 250 रुपयांची घसरण; सुकामेव्याचे दर स्थिर

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI