मुंबई बाजार समितीत भाजीपाल्याला अच्छे दिन, दरात दुपटीनं वाढ, शेतकऱ्यांना दिलासा

मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये आज 640 गाड्यांची आवक झाली असून भाजीपाला दर दुपटीने वाढले आहेत. संकटांवर संकटे झेलणाऱ्या शेतकऱ्याला वाढलेल्या भाजारभावामुळे दिलासा मिळेल, अशी अशा व्यक्त केली जात आहे.

मुंबई बाजार समितीत भाजीपाल्याला अच्छे दिन, दरात दुपटीनं वाढ, शेतकऱ्यांना दिलासा
बाजार समिती


नवी मुंबई: मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये आज 640 गाड्यांची आवक झाली असून भाजीपाला दर दुपटीने वाढले आहेत. दोन दिवसांपूर्वी मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळल्याने मालाची आवक वाढली असली तरी दर्जेदार भाजीपाला येत नसल्याने दरवाढ झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. भाजीपाल्याचे दर वाढल्यानं  शेतकऱ्यांना फायदा होईल, असे दिसत आहे. संकटांवर संकटे झेलणाऱ्या शेतकऱ्याला वाढलेल्या भाजारभावामुळे दिलासा मिळेल, अशी अशा व्यक्त केली जात आहे.

गणरायाच्या स्थापनेपासून भाजीपाल्याचे दर वाढले

श्रावण महिन्यात नियमित बाजारभाव वाढलेले असतात. मात्र,  यावर्षीच्या श्रावण महिन्यात घाऊक बाजारात 10 ते 12 रुपये प्रतिकिलो भाजीपाला विकला जात होता. त्यामुळे पहिल्यांदाच अशाप्रकारे श्रावणात बाजारभाव कमी असल्याची खंत व्यापाऱ्यांनी व्यक्त केली होती. जवळपास महिनाभर बाजारभाव जैसे थे होते. मात्र, गणेश चतुर्थी म्हणजेच गणरायाच्या स्थापनेपासून बाजारभाव वाढू लागले होते.

भाजीपाल्याच्या दरात दुप्पट वाढ

गणरायाच्या स्थापनेपासून भाजीपाल्यांच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली होती. परिणामी आज सर्वच भाज्यांच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे.
मुंबई एपीएमसी भाजीपाला घाऊक बाजारात वांगी 24, कारले 16, दुधीभोपळा 24, काकडी 25, कोबी 5, फ्लावर 30, शिमला 36, फरसबी 40 तर मिरची 14 रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहे.

किरकोळ बाजारात चढ्या दरानं विक्री

किरकोळ बाजारावर नियंत्रण नसल्याने 20 ते 25 रुपये पाव किलोने भाजीपाला विक्री होत आहे. त्यामुळे पावसाळा सुरु झाल्यापासून मातीमोल भावाने भाजीपाला विकला जात होता. मात्र, हे बाजारभाव वाढल्याने शेतकऱ्यांना फायदा होईल असे दिसत आहे. संकटांवर संकटे झेलणाऱ्या शेतकऱ्याला वाढलेल्या भाजारभावामुळे दिलासा मिळेल, अशी अशा व्यक्त केली जात आहे.

नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त नमो सेल

मुंबई एपीएमसी मार्केटमधील धान्य बाजारात नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त काल “नमो सेल” नावाने डाळीचे व्यापाऱ्यांनी सवलतीच्या दरात अन्नधान्याची विक्री ठेवली होती. या ठिकाणी विविध प्रकारच्या तांदूळ व डाळींवर किलोमागे 2 रुपयांपर्यंत सवलत देण्यात आली होती. मुगडाळ 85 रुपयांवरून 83 रुपये, तूरडाळ 90 रुपयांवरून 88 रुपये, मसूर 85 रुपयांवरून ते 83 रुपये, उडीदडाळ 85 रुपयांवरून 83 रुपये तर चनाडाळ 65 रुपयांवरून 63 रुपये विकण्यात आली. तर इतर अन्नधान्यांवरील 2 रुपये कमी करण्यात आले होते. यात धान्य व्यापाऱ्यांच्या वतीने जवळपास २ हजार टन धान्य विकण्याचा संकल्प करण्यात आल्याची माहिती ग्रोमा सचिव अमृतलाल जैन यांनी दिली होती.

केंद्र सरकार आणि राज्य सरकार पासून सामान्य ग्राहकांपर्यंत डाळींबाबत नेहमीच चर्चा होत असते. तर डाळीचे दर त्यांची साठवणूक तसेच तुटवडा आणि मागणी याबाबत सातत्याने अनेकजण लक्ष देऊन असतात. डाळींची आवक, डाळींच्या साठ्यावरील निर्बंध यावर देखील नियमित खलबते सुरु असतात. मात्र, काल ग्राहकांना वेगळा अनुभव आला. धान्य मार्केटमध्ये अनेक व्यापाऱ्यांनी स्वेच्छेने सर्वच अन्नधान्याच्या वस्तूंवर सवलत ठेवली होती.

इतर बातम्या:

Breaking : आधी भाजपात गेले, नंतर संन्यास घेतो म्हणाले आणि आता थेट ममता दिदीच्याच पक्षात, भाजपला झटका

‘पवारांना ठाकरेंवर नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार नाही, त्यांच्यावर जनताच नाराज’, मुनगंटीवारांचा जोरदार टोला

Mumbai APMC market vegetables rate increased today farmers get benefits of this

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI