रुग्णाला घरी सोडण्याच्या 48 तास आधी रुग्णालयांनी त्याचे बिल पालिकेला पाठवावे; नवी मुंबई महापालिकेचे आदेश

रुग्णाला घरी सोडण्यापूर्वी 48 तास अगोदर त्याचे उपचाराचे बिल रूग्णालयांनी पालिकेकडे पडताळणीसाठी पाठवावे, असे आदेश काढण्यात आले आहेत.

रुग्णाला घरी सोडण्याच्या 48 तास आधी रुग्णालयांनी त्याचे बिल पालिकेला पाठवावे; नवी मुंबई महापालिकेचे आदेश
नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर
Follow us
| Updated on: May 28, 2021 | 12:16 AM

नवी मुंबई : आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यासोबत नियमित घेत असलेल्या कोरोना नियंत्रण आढावा बैठकांमधून अनेक कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. आजही अशीच बैठक झाली बैठकीत नाईक यांनी प्रामुख्याने लसीकरण, शिक्षण, आरोग्य, पावसाळापूर्व कामे इत्यादी विषयांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी महापौर सागर नाईक आदी उपस्थित होते. (Hospitals should send patients bills to the municipality 48 hours before the patient leaves home; NMMC Order,abhijit bangar)

दरम्यान, या बैठकीवेळी आमदार गणेश नाईक यांनी रुग्णालयांकडून रुग्णांची लुट होत असल्याच्या प्रकरणांवरुन आयुक्तांना प्रश्न विचारले असता, पालिका आयुक्त बांगर यांनी माहिती दिली की, रूग्णाला घरी सोडण्यापूर्वी 48 तास अगोदर त्याचे उपचाराचे बिल रूग्णालयांनी पालिकेकडे पडताळणीसाठी पाठवावे, असे आदेश काढण्यात आले आहेत. तसेच बिलांच्या तक्रारी सोडविण्यासाठी पालिकेने नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.

बैठकीवेळी नाईक म्हणाले की, आवाजवी बिल आकारून खाजगी रुग्णालयांनी रूग्णांची लूट केल्याची प्रकरणे समोर येत आहेत. हे टाळण्यासाठी रूग्णाला डिस्चार्ज मिळण्यापूर्वीच पालिकेने त्याच्या बिलांची पळताळणी करावी, म्हणजे नंतर होणारे वाद उद्भवणार नाहीत, अशी मागणी आमदार नाईक यांनी केली. त्यावर खुलासा करताना आयुक्त बांगर म्हणाले, रूग्णाला घरी सोडण्यापूर्वी 48 तास अगोदर त्याचे उपचाराचे बिल पालिकेकडे रूग्णालयांनी पडताळणीसाठी पाठवावे, असे आदेश काढले आहेत. बिलांच्या तक्रारी सोडविण्यासाठी पालिकेने नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.

100 टक्के लसीकरण हाच कोरोना प्रतिबंधावर प्रभावी उपाय

कोरोनाला पळवायचे असेल तर 100 टक्के नागरिकांचे लसीकरण हा एकमेव प्रभावी उपाय असल्याचे मत आमदार नाईक यांनी यावेळी मांडले. नवी मुंबईत पालिका आणि खासगी रूग्णालयांच्या माध्यमातून लसीकरण सुरू आहे. सोसायट्यांनाही लसीकरणासाठी परवानगी देण्यात येत आहे. सोसायट्यांच्या अर्जांवर कार्यवाही करून लवकरात लवकर त्यांना लसीकरणासाठी परवानगी द्यावी.

नवी मुंबई सुरु असलेल्या लसीकरणाची गती वाढविण्याची गरज आहे. पालिकेने लवकरात लवकर लस खरेदी करावी. त्यासाठी लस उत्पादक कंपन्यांसोबत पत्रव्यवहार करावा आणि लवकरात लवकर लस उपलब्ध करून द्यावी. जेव्हा केंद्र सरकार पालिकांना लस खरेदीसाठी परवानगी देईल, त्यावेळेस जागरूक राहून लस खरेदीची प्रक्रीया तातडीने सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली असता आयुक्त अभिजित बांगर यांनी ती मान्य केली.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा, टॅब आणि डेस्कटॉपची व्यवस्था करा

गणेश नाईक म्हणाले की, कोरोना महामारीमुळे चालू शैक्षणिक वर्षात महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. खासगी शाळांच्या तुलनेत पालिका शाळांमधील विद्यार्थी मागे पडले. मात्र नवीन शैक्षणिक वर्षात हे चित्र बदलले पाहिजे. विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा अधिकार अबाधित राखण्यासाठी आतापासूनच अभ्यासक्रमाचे नियोजन करावे, असा सल्ला आमदार नाईक यांनी दिला. पालिका अर्थसंकल्पातील सर्वाधिक निधी हा शिक्षण आणि आरोग्यावर खर्च करावा. गरज पडली तर पालिकेने विद्यार्थ्यांना टॅब (टॅबलेट) द्यावेत. डेस्कटापॅकची व्यवस्था करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

माजी आमदार संदीप नाईक यांनी शिक्षकांना शिक्षकेतर कामांत गुंतवूण ठेवल्याने शिक्षणाचा दर्जा ढासळतो, असे मत मांडले. पालिकेने शिक्षण तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन शाळांचे नियोजन करावे, असा सल्ला दिला. त्यावर आयुक्त बांगर यांनी शिक्षण तज्ज्ञांना विचारून ऑनलाईन शिक्षण, अभ्यास साहित्य इत्यादींचे नियोजन मे महिन्यापूर्वीच करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

इतर बातम्या

सिडको सदनिका सोडतधारकांचा दुरुस्ती देखभाल खर्च माफ करा, सोशल मीडियावर विशेष मोहीम

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्या, नाना पटोलेंची आग्रही मागणी

(Hospitals should send patients bills to the municipality 48 hours before the patient leaves home; NMMC Order,abhijit bangar)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.