AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवी मुंबईतील बांधकाम व्यवसायिकांना मोठा दिलासा; नगरविकास विभागाचे महत्वाचे निर्णय, एकनाथ शिंदेंची घोषणा

या निर्णयामुळे नवी मुंबईतील सिडको क्षेत्रात काम करणाऱ्या विकासकांना वर्षानुवर्षे भेडसावणारे प्रश्न सोडवण्यासाठी मदत होणार आहे. तशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय.

नवी मुंबईतील बांधकाम व्यवसायिकांना मोठा दिलासा; नगरविकास विभागाचे महत्वाचे निर्णय, एकनाथ शिंदेंची घोषणा
एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्रीImage Credit source: TV9
| Updated on: May 17, 2022 | 12:09 AM
Share

मुंबई : नवी मुंबईतील बांधकाम व्यवसायिकांना (Builder) दिलासा देण्यासाठी नगरविकास विभागाने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयामुळे नवी मुंबईतील सिडको (Navi MUmbai CIDCO) क्षेत्रात काम करणाऱ्या विकासकांना वर्षानुवर्षे भेडसावणारे प्रश्न सोडवण्यासाठी मदत होणार आहे. तशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिलीय. त्यात नवी मुंबई विमानतळाजवळील बांधकामांची उंची जुन्या कलर कोडेड झोनल मॅप नुसार ठेवण्यासाठी मी स्वतः केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. सिडकोच्या 22.05 टक्के योजनेतील त्रिपक्षीय करारनामा करताना द्यायचे सुविधा शुल्क चार समान हफ्त्यात द्यायला मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली.

एकनाथ शिंदेंकडून महत्वाच्या निर्णयांची घोषणा

  1. नवी मुंबई विमानतळाजवळील बांधकामांची उंची जुन्या कलर कोडेड झोनल मॅप नुसार ठेवण्यासाठी मी स्वतः केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांना पत्र लिहिणार आहे.
  2. सिडकोच्या 22.05 टक्के योजनेतील त्रिपक्षीय करारनामा करताना द्यायचे सुविधा शुल्क चार समान हफ्त्यात द्यायला मंजुरी देण्यात आली आहे.
  3. बांधकाम मुदतवाढीच्या ना हरकत दाखल्यासाठी एकाच वेळी अर्ज करून ३ वर्षांपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
  4. नवी मुंबईतील कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन 2019 ला लवकरच राज्याचा पर्यावरण विभाग मंजुरी देणार आहे.
  5. सीआरझेडमुळे रखडलेल्या प्रकल्पांची छाननी करून महिन्याभराच्या आत भोगवटा प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
  6. सिडकोच्या मोठ्या भूखंडांवरील बांधकामासाठी अतिरिक्त 4 वर्षांचा कालावधी वाढवून देण्याला मंजुरी दिली आहे.
  7. सिडको क्षेत्रातील प्रलंबित मावेजा प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी मनुष्यबळ वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  8. कोविड 19 कालावधीमध्ये शासनाने कोणताही अतिरिक्त भाडेपट्टा न आकारता भूधारकांसाठी 9 महिन्यांची मुदतवाढ जाहीर केली आहे.
  9. ज्या विकासकांनी या अगोदर मुदतवाढीचे शुल्क भरले आहे, त्यांचे शुल्क पुढील काळात समायोजित करण्यात येणार आहे.

फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.