Omicron | मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये ओमीक्रॉनचा प्रसार वाढू नये म्हणून एपीएमसी पोलीस अॅक्शन मोडमध्ये

एपीएमसी पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांनी फळ मार्केटची पाहणी केली. या दरम्यान विविध बाजार घटकांनी आपल्या समस्यांचा पाढा त्यांच्यासमोर मांडला. ओमीक्रॉन व्हेरिएंटच्या धर्तीवर बाजारपेठेत मास्क अनिवार्य करण्याची सूचना यावेळी नलावडे यांनी दिली.

Omicron | मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये ओमीक्रॉनचा प्रसार वाढू नये म्हणून एपीएमसी पोलीस अॅक्शन मोडमध्ये
मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये ओमीक्रॉनचा प्रसार वाढू नये म्हणून एपीएमसी पोलीस एक्शन मोडमध्ये

नवी मुंबई : सध्या देशावर तिसऱ्या लाटेचे संकट घोंगावू लागलं आहे. त्यामुळे राज्य सरकारने नवी नियमावली जारी करत राज्यभर आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत नवी मुंबई शहरासाठी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबई एपीएमसी मार्केट नवी मुंबई प्रशासनाच्या केंद्रस्थानी असून पोलीस एक्शन मोडमध्ये आले आहेत. ओमीक्रॉनचा प्रसार सुरुवातीपासूनच रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.

अनेक लोक व्यापाऱ्यांच्या पेढ्यांवर बेकायदा वास्तव्य करताहेत

एपीएमसी पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांनी फळ मार्केटची पाहणी केली. या दरम्यान विविध बाजार घटकांनी आपल्या समस्यांचा पाढा त्यांच्यासमोर मांडला. ओमीक्रॉन व्हेरिएंटच्या धर्तीवर बाजारपेठेत मास्क अनिवार्य करण्याची सूचना यावेळी नलावडे यांनी दिली. तसेच फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये सुरु असलेल्या अनाधिकृत व्यापार आणि पेढ्यांवरील वास्तव्य या मार्केटमधील गंभीर विषयांवर चर्चा करण्यात आली. अनेक लोक व्यापाऱ्यांच्या पेढ्यांवर बेकायदा वास्तव्य करत आहेत. या लोकांची कोणती नोंदणी प्रशासनाकडे नाही. त्यामुळे अनेक गंभीर गुन्हेगार मार्केटचा आसरा घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर आशिया खंडातील मोठ्या बाजारपेठेची आता मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख होऊ लागली आहे.

पोलीस कोम्बिंग ऑपरेशन करणार

यावर पोलीस कोम्बिंग ऑपरेशन करणारे असल्याचे नलावडे यांनी यावेळी झालेल्या बैठकी दरम्यान सांगितले. तर व्यापारी बाळासाहेब बेंडे यांनी मार्केटमध्ये रात्रंदिवस चालणाऱ्या कॅन्टीनबाबत समस्या मांडताच रात्री 11 नंतर बंद करण्याचे निर्देश त्यांनी दिले. या कँटीन अतिक्रमण करून वाहतुकीला देखील अडथळा निर्माण करतात. तर उघड्यावर एलपीजी गॅस सिलेंडरचा वापर करून सुरक्षतेला बाधा पोहचवत आहेत. मार्केटमध्ये सातत्याने पेट्रोलिंग केले जाणार असल्याचे नलावडे म्हणाले. तसेच मार्केटबाहेरील अनाधिकृत फेरीवाले पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. याबाबत महापालिका प्रशासन आणि वाहतूक विभाग यांच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावणार असल्याचे ते म्हणाले.

एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांच्या नवनियुक्तीबाबत त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मार्केट संचालक संजय पानसरे, व्यापारी बाळासाहेब बेंडे, उपसचिव संगिता अढांगळे, सुरक्षा अधिकारी संजय तळेकर, व्यापारी, वाहतूकदार, कर्मचारी, माथाडी उपस्थित होते. (In the APMC Police Action Mode to prevent the spread of Omicron in the Mumbai APMC market)

इतर बातम्या

कल्याण-दिवा येथे रस्ते अपघातात तरुण ठार; कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मनसे आमदाराची मागणी

Omicron : दिलासादायक! राज्यातल्या पहिल्या ओमिक्रॉन रुग्णाला डिस्चार्ज, आयुक्त म्हणाले…

Published On - 7:28 pm, Thu, 9 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI