पंतप्रधान मोदी यांच्या ‘त्या’ टीकेवर शरद पवार काय म्हणाले?; काय दिलं उत्तर?

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे अलिबागच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पवारांवर टीका केली होती. त्यावरही शरद पवार यांनी आज भाष्य केलं. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यावेळी कानपिचक्या देताना दिलेला शब्द पाळा, असा सल्लाही दिला.

पंतप्रधान मोदी यांच्या 'त्या' टीकेवर शरद पवार काय म्हणाले?; काय दिलं उत्तर?
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 27, 2023 | 3:28 PM

निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, अलिबाग | 27 ऑक्टोबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली होती. शरद पवार यांनी कृषी मंत्री म्हणून काय केलं? असा सवाल मोदी यांनी केला होता. मोदी यांच्या या सवालाला खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवार यांची स्तुती करणारे मोदी खरे की कालचे मोदी खरे असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे. तसेच कृषीक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मोदी सरकारनेच शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार दिला होता, याकडेही सुप्रिया सुळे यांनी लक्ष वेधलं. तर त्यांच्या प्रतिक्रियेवर काय बोलू? मी आता उद्याच त्यावर भाष्य करेल, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे शरद पवार उद्या काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शरद पवार आज अलिबागच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. शरद पवार यांना मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणावर विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कानपिचक्या दिल्या. जरांगे पाटील यांनी काही मागण्या केल्या आहेत. त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी संवाद साधला.

बोलणं काय झालं हे माहीत नाही. पण त्यांना 30 दिवसांची मुदत दिली होती. त्यावर जरांगेंनी वाढवून मुदत दिली होती. त्या काळात काम होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना दिला होता. जे काम होणार नसेल तो शब्द कधी देऊ नये. इथे शब्द दिलाय हे प्राथमिक दृष्ट्या दिसतं. त्यामुळे उपोषण करणाऱ्यांना दोष देता येणार नाही, असं शरद पवार म्हणाले.

ढाकणे जिद्दीचा कार्यकर्ता

यावेळी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं. तसेच ढाकणे यांच्या आठवणी जागवल्या. बबनराव ढाकणे माझ्या मंत्रिमंडळात मंत्री होते. गरीब कुटुंबातील आणि जिद्दीचा कार्यकर्ता म्हणून त्यांचा लौकीक होता. ते जनता पक्षात होते. त्यांनी जनता पक्षाचं महाराष्ट्राचं नेतृत्वही केलं आहे. त्यांनी मंत्रिपदाची जबाबदारीही सांभाळली. लोकांच्या प्रश्नासाठी सतत संघर्ष करणं हा त्यांचा स्वभाव होता. ते उत्तम सहकारी होते, असं शरद पवार यांनी म्हटलंय.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेवर भाष्य केलं आहे. शरद पवार हे माझे गुरू आहेत असं मोदीच म्हणाले होते. शेतीमधील उत्कृष्ट कार्याबद्दल मोदी सरकारनेच शरद पवार यांना पद्मविभूषण दिला होता. तसेच शरद पवार यांच्या कार्याचा गौरव केला होता. त्यामुळे कालचे मोदी खरे की आधीचे मोदी खरे हा प्रश्न आहे, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला होता.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.