VIDEO : नवी मुंबईतील गावगुंडांची दहशत सीसीटीव्हीत कैद; हॉकी स्टिकने केली बेदम मारहाण

VIDEO : नवी मुंबईतील गावगुंडांची दहशत सीसीटीव्हीत कैद; हॉकी स्टिकने केली बेदम मारहाण
नवी मुंबईतील गावगुंडांची दहशत सीसीटीव्हीत कैद
Image Credit source: TV9

खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या अंबिका नगर सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. दोघे गावगुंड वाहन पार्किंगवरून सातत्याने वाद घालत होते. स्थानिक रहिवाशांना ते वारंवार पार्किंगवरून धमकावत असायचे. याच वादातून त्यांनी एका रहिवाशाला बेदम मारहाण करण्याचा कहर केला.

रवी खरात

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

May 28, 2022 | 10:45 PM

नवी मुंबई : नवी मुंबईत अलीकडच्या काळात वाहन पार्किंग हा चिंतेचा विषय बनला आहे. यावरून होणारे वाद प्राणघातक ठरू लागले आहेत. असाच एक प्रकार सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर आला आहे. पार्किंग (Parking)वरून सातत्याने वाद घालणाऱ्या गावगुंडांनी एका इसमाला हॉकी स्टिक (Hockey Sticks)ने बेदम मारहाण (Beaten) केली. गावगुंडांची ही दहशत सीसीटीव्ही फुटेजमुळे उजेडात आली आहे. गावगुंडांच्या गुन्हेगारी कृत्याचा अतिरेक फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला असून परिसरात गावगुंडांच्या दहशतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

खांदेश्वरच्या अंबिका नगरमध्ये घडली घटना

खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या अंबिका नगर सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. दोघे गावगुंड वाहन पार्किंगवरून सातत्याने वाद घालत होते. स्थानिक रहिवाशांना ते वारंवार पार्किंगवरून धमकावत असायचे. याच वादातून त्यांनी एका रहिवाशाला बेदम मारहाण करण्याचा कहर केला. दोघा गावगुंडांनी हॉकी स्टिकच्या साहाय्याने प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडला आहे. मारहाणीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. क्षुल्लकशा कारणावरून गावगुंडांनी घातलेला हैदोस सीसीटीव्ही फुटेजमुळे उजेडात आला आहे.

प्राणघातक हल्ला करून गावगुंड झाले फरार

रहिवाशावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गावगुंडांनी प्राणघातक हल्ला करून धूम ठोकली. सध्या दोन्ही आरोपी फरार असून पोलीस आसपासच्या परिसरासह इतरत्र त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी तपासाला गती दिली आहे. गावगुंड हे अंबिका नगर सोसायटीतच राहणारे असून त्यांनीच ही मारहाण केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दोघांनी सुरुवातीला पोलीस ठाणे गाठले होते. आरोपीनेच आम्हाला मारहाण केली आहे, असा कांगावा करीत ते पोलीस ठाण्यात गेले होते. त्यामुळे पोलिस देखील चक्रावून गेले. मात्र सीसीटीव्ही फुटेजमुळे गावगुंडांच्या दहशतीचा पर्दाफाश झाला. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी फरार आहेत. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. (Terror of village goons in Navi Mumbai captured on CCTV beaten by hockey sticks)

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें