AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VVMC Election 2022 Ward No 20 | बहुजन विकास आघाडीचा पुन्हा हुकमी एक्का की शिंदे गट ठरणार भारी, भाजप मारू शकतो बाजी?

VMC Election 2022 Ward No 20 | हितेंद्र ठाकूर सर्वेसर्वा असलेल्या बहुजन विकास आघाडीने गेल्या निवडणुकीत करिष्माई विजय मिळवला होता. एकहाती सत्ता खेचून आणली होती. या निवडणुकीतही हाच पायंडा कायम राहिल का?

VVMC Election 2022 Ward No 20 | बहुजन विकास आघाडीचा पुन्हा हुकमी एक्का की शिंदे गट ठरणार भारी, भाजप मारू शकतो बाजी?
पुन्हा एकहाती सत्ता?Image Credit source: TV9marathi
| Updated on: Aug 07, 2022 | 9:24 AM
Share

VMC Election 2022 Ward No 20 | महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी पूर्वीही वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचा प्रयोग राबवण्यात आलेला आहे. वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीच्या (VVMC election 2022) तोंडावर सत्तेच्या या एकहाती गडावर तोफगोळे पडायला सुरुवात झाली आहे. हितेंद्र ठाकूर सर्वेसर्वा असलेल्या महापालिकेवर शिंदेगट आणि भाजप झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे. मागील निवडणूक 2015ला झाली होती. आता येथील निवडणूक इतर महापालिकांच्या निवडणुकीसोबत होणार असल्याचे दिसत आहे. एकूण 115 जागांसाठी ही निवडणूक असणार आहे. 115 जागांपैकी तब्बल 106 जागांवर बहुजन विकास आघाडीने (Bahujan Vikas Aaghadi) एकहाती विजयी पतका फडकवली होती. त्यावेळी एक प्रभाग एक नगरसेवक अशी रचना होती. यावेळी तीन सदस्यीय प्रभागरचना असणार आहे. त्यातही बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र सध्यातरी तीन सदस्यीय प्रभाग रचनेप्रमाणे प्रशासनाने तयारी केली आहे. यामुळे प्रभागांची रचना बदलली आहे. त्याचबरोबर आरक्षणही बदलले आहे. यावेळी एकूण 42 वॉर्डातून (Ward) निवडणुकीचा बार उडेल. ठाकूर यांच्या साम्राज्याला हादरे देण्यासाठी शिंदे-फडणवीस यांच्यासोबतच मनसेने ही कंबर कसली आहे.

प्रभागातील व्याप्ती कशी?

प्रभाग 20 मध्ये नालासोपारा पश्चिम पोलीस ठाणे, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, पाटणकर पार्क, गॅलॅक्सी हॉटेल, एस.टी.डेपो, शनी मंदिर, हसन इब्राहिम मशिद, विनी रेडिडेन्सी, समेळपाडा, गोकुळ आनंद, एमसीसी क्रीडांगण, शूर्पारक मैदान पूर्व बाजू आदी महत्त्वाचा परिसर आहे.

लोकसंख्येचे गणित

प्रभाग 20 मधील एकूण लोकसंख्या 30,121 इतकी असून यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 2010 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 417 इतकी आहे.

कोण मारणार बाजी?

2015च्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने एकतर्फी विजय मिळवला होता. याठिकाणी 115पैकी 106 जागा मिळवत इतर सर्वच पक्षांना झोपवले होते. इतर पक्षांमध्ये शिवसेनेला 5, भाजपाला 1 तर काँग्रेसला 1 जागा मिळाली होती. त्यामुळे विजयाची पुनरावृत्ती बहुजन विकास आघाडी करणार का, हे पाहावे लागणार आहे.

विजयी उमेदवार (2017)

प्रभाग 20 मध्ये मागील वेळी प्रज्ञा विनेश देसाई यांनी बाजी मारली होती. यावेळी आरक्षण आणि प्रभाग रचना बदलली असल्यामुळे प्रत्येकालाच आपला सोयीस्कर प्रभाग शोधावा लागणार आहे.

प्रभाग 20 अ

पक्षउमेदवारविजयी
बहुजन विकास आघाडी
शिवसेना
भाजप
मनसे
काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस
अपक्ष

प्रभाग 20 ब

पक्षउमेदवारविजयी
बहुजन विकास आघाडी
शिवसेना
भाजप
मनसे
काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस
अपक्ष

प्रभाग 20 क

पक्षउमेदवारविजय
बहुजन विकास आघाडी
शिवसेना
भाजप
मनसे
काँग्रेस
राष्ट्रवादी
अपक्ष

आरक्षण कसे?

प्रभाग 20 मध्ये मागील वेळेप्रमाणे आरक्षण नसून त्यात बदल झाला आहे. त्यानुसार 20 अ हा अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव असेल. तर ब हा सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी आणि क सर्वसाधारण उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?