जातीवाचक शिविगाळ, विवाहबाह्य संबंधाच्या आरोपानंतर मनसे काय करणार? गजानन काळेंवर कारवाई होणार?

| Updated on: Aug 12, 2021 | 12:44 PM

मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यावर त्यांच्या पत्नीने विवाहबाह्य संबंद आणि जातीवाचक शिवीगाळीचे आरोप केले आहेत. (gajanan kale)

जातीवाचक शिविगाळ, विवाहबाह्य संबंधाच्या आरोपानंतर मनसे काय करणार? गजानन काळेंवर कारवाई होणार?
gajanan kale
Follow us on

नवी मुंबई: मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यावर त्यांच्या पत्नीने विवाहबाह्य संबंद आणि जातीवाचक शिवीगाळीचे आरोप केले आहेत. तशी तक्रारच पोलीस ठाण्यात केली आहे. त्यामुळे काळे अडचणीत आले असून त्यांच्यावर मनसेकडून कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (will mns take action against gajanan kale?)

गजानन काळे हे मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष आहेत. त्यांनी बेलापूर विधानसभेची निवडणूकही लढवली होती. शहरात त्यांचा दबदबा आहे. मात्र, पत्नीने केलेल्या आरोपामुळे काळे अडचणीत सापडले आहेत. या घटनेमुळे मनसेत खळबळ उडाली आहे. मात्र, त्यावर मनसेचे पदाधिकारी बोलायला तयार नाहीत. पदाधिकाऱ्यांनी मौन साधल्याने काळे यांच्यावर मनसेकडून कारवाई होणार की नाही यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.

घरगुती वादामुळे मनसेचं मौन

दरम्यान, काळे यांच्या पत्नीने त्यांच्यांवर तक्रार केली आहे. त्यामुळे हा काळे कुटुंबीयांचा घरगुती वाद आहे. त्यामुळे त्यावर बोलणं उचित ठरणार नाही, असं मनसेचे पदाधिकारी सांगतात. मात्र, असं असलं तरी या प्रकरणात आणखीही वेगळ्या गोष्टी पुढे आल्याने पक्षाने त्याची गंभीर दखल घेतली पाहिजे, असाही एक सूर मनसेतून उमटत असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे मनसेप्रमुख या प्रकरणावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आरोप काय?

गजानन काळे यांचे अनेक महिलांशी संबंध होते. 2018 मध्ये एका महिला टीव्ही पत्रकारासोबत त्याचं अफेयर्स सुरु होतं. मी गजाननच्या मोबाईलमध्ये दोघांचे मेसेज पाहिले होते… त्यांना दोघांना एकत्र फिरताना, हॉटेलमध्ये जेवताना पाहिलं. त्यानंतर पुन्हा 2021 मध्ये त्याचे एका महिला पत्रकारासोबत अनैतिक संबंध सुरु झाले. याबद्दल मी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला मात्र, मी राजकारणी आहे, मला कुणी काही करु शकत नाही.. मला तू आणि मुलगा यांच्यापासून स्पेस हवी आहे…. तुझी आणि मुलाची मी यापुढे जबाबदारी घेणार नाही, असं म्हणत सातत्याने त्याने मला त्रास दिलाय”, असं त्यांच्या पत्नीने पोलिस तक्रारीत म्हटलं आहे.

2008 मध्ये आमचं लग्न झालं. लग्नानंतरच्या काहीच दिवसांत आमच्यात भांडण सुरु झालं. तेव्हापासून आमच्यात वारंवार खटके उडतात. तू सावळी आहेस, तुझी जात वेगळी आहे. तुझ्याशी लग्न करुन माझा काही एक फायदा झाला नाही… तुझ्या वडिलांची पोस्ट (हुद्दा) बघून मी तुझ्याशी लग्न केलं, असेही गंभीर आरोप गजानन काळे यांच्या पत्नीने त्यांच्यावर केले आहेत. (will mns take action against gajanan kale?)

 

संबंधित बातम्या:

विवाहबाह्य संबंध, बायकोला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप असलेले गजानन काळे नेमके कोण आहेत?

अनेक स्त्रियांशी संबंध, जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण, मनसे नेते गजानन काळेंवर पत्नीचे गंभीर आरोप

गजानन काळे यांच्याविरोधात गंभीर आरोप करत पत्नीकडूनच गुन्हा दाखल, मनसेत खळबळ

(will mns take action against gajanan kale?)