AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navi Mumbai : ऐरोलीत महिलांसाठी मॅंग्रोव्हेथॉन, अमृता फडणवीसांची उपस्थिती, खारफुटीच्या संवर्धनासाठी पुढाकार

खारफुटीच्या संवर्धनाच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढे टाकत ऐरोलीमधील इनरव्हील क्लब आणि मॅंग्रोव्हज फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ऐरोलीतील महिलांसाठी मॅंग्रोव्हेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी याठिकाणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अमृता फडणवीस यांची उपस्थिती होती.

Navi Mumbai : ऐरोलीत महिलांसाठी मॅंग्रोव्हेथॉन, अमृता फडणवीसांची उपस्थिती, खारफुटीच्या संवर्धनासाठी पुढाकार
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मान्यवर.Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Mar 28, 2022 | 7:51 AM
Share

नवी मुंबई : वाढत्या ग्लोबल वार्मिंगची (Global Warming) डोकेदुखी दिवसागणिक वाढत चालली आहे. यावर देशासह जागतिक स्तरावर विचारमंथन वेळोवेळी केलं जातं. मात्र, ग्लोबल वार्मिंगचा वाढता धोका लक्षात घेता निसर्गाचं संवर्धन करणं गरजेचं आहे. रोज वाढणारी सिमेंटची जंगले पाहता निसर्ग संवर्धनाचं सोडाच आपण सिमेंटचे जंगल दिवसागणिक वाढवत असल्याचं दिसंतय. याच पार्श्वभूमीवर खारफुटीच्या संवर्धन आणि संवर्धनाच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढे टाकत ऐरोलीमधील इनरव्हील क्लब आणि मॅंग्रोव्हज फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ऐरोलीतील महिलांसाठी मॅंग्रोव्हेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी याठिकाणी अमृता फडणवीस (Amruta fadnavis) यांची उपस्थिती होती. मॅंग्रोव्हेथॉनमध्ये 3 किमी 5 किमी आणि 10 किमी गटात मुंबई आणि नवी मुंबईतील (Navi Mumbai) अनेक शाळांमधील विद्याथ्यांनी सहभाग घेतला होता. खारफुटीच्या संवर्धनाच्या दिशेनं इनरव्हील क्लब आणि मॅंग्रोव्हज फाऊंडेशन स्तूत्य उपक्रम हाती घेतलाय.

संवर्धनासाठी विशेष उपक्रम

पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी अनेक समाजसेवी संस्था पुढे येतात. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी विविध उपक्रमही राबवले जातात. खारफुटी वाचवण्यासाठी ऐरोलीमधील इनरव्हील क्लब आणि मॅंग्रोव्हज फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ऐरोलीतील महिलांसाठी मॅंग्रोव्हेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी याठिकाणी अमृता फडणवीस यांची उपस्थिती होती. मॅंग्रोव्हेथॉनमध्ये 3 किमी 5 किमी आणि 10 किमी गटात मुंबई आणि नवी मुंबईतील अनेक शाळामधील विद्याथ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी खारफुटीच्या संवर्धनासाठी आणखी लोकांनी पुढे येण्याचं आवाहन करण्यात आलं. तर यासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून आपण खारफुटीचे संवर्धन करु शकतो, असंही मान्यवरांनी बोलून दाखवलं.

अमृता फडणवीसांची उपस्थिती

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्ती अमृता फडणवीस विविध सामाजिक उपक्रमात भाग घेताना दिसून येतात. ऐरोलीतील महिलांसाठी मॅंग्रोव्हेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी याठिकाणी अमृता फडणवीस यांची प्रमुख   उपस्थिती होती. अमृता फडणवीस यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं. यावेळी बोलतांना त्यांनी या सारख्या उपक्रमांची सध्या अधिक गरज असल्याचंही बोलून दाखवलं. फ्लेमिंगो सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नवी मुंबईतील समुद्राच्या तळावर पसरलेल्या खारफुटीला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे, असंही अमृता फडणवीस यावेळी म्हणाल्या.

ग्लोबल वार्मिंगची चिंता

सध्या ग्लोबल वार्मिंगची चिंता वाढते आहे. वाढत्या ग्लोबल वार्मिंगची डोकेदुखी दिवसागणिक वाढत चालली आहे. यावर देशासह जागतिक स्तरावर विचारमंथन वेळोवेळी केलं जातं. मात्र, ग्लोबल वार्मिंगचा वाढता धोका लक्षात घेता निसर्गाचं संवर्धन करणं गरजेचं आहे. रोज वाढणारी सिमेंटची जंगल पाहता निसर्ग संवर्धनाचं सोडाच आपण सिमेंटचे जंगल दिवसागणिक वाढवत असल्याचं दिसंतय. यातच ऐरोलीमधील इनरव्हील क्लब आणि मॅंग्रोव्हज फाऊंडेशनने खारफुटीच्या संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकलंय.

इतर बातम्या

Pramod Sawant : आज गोव्यात शपथविधी, प्रमोद सावंत दुसऱ्यांदा होणार मुख्यमंत्री, नव्या मंत्रिमंडळात कुणाला संधी?

महावितरणची छप्परफाड वसुली; शेतकऱ्यांनी 10 दिवसांत पावणेअकरा कोटींचे वीजबिल भरले!

Summer Season: कीड नियंत्रण हेच सीताफळाचे उत्पादन वाढीचे सूत्र, उन्हाळी बहरात योग्य व्यवस्थापन गरजेचे

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.