VIDEO: आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही आणि चोरांना तर नाहीच नाही; नवाब मलिकांनी ठणकावले

| Updated on: Oct 30, 2021 | 6:44 PM

सोशल मीडियावर लाल कपडे टाकून नवाब मलिक घाबरतील असं काही लोकांना वाटतं... पण आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही आणि चोरांना तर नाहीच नाही. (nawab malik slams bjp over mumbai cruise party case)

VIDEO: आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही आणि चोरांना तर नाहीच नाही; नवाब मलिकांनी ठणकावले
nawab malik
Follow us on

गोंदिया: सोशल मीडियावर लाल कपडे टाकून नवाब मलिक घाबरतील असं काही लोकांना वाटतं… पण आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही आणि चोरांना तर नाहीच नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

नवाब मलिक गोंदियाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. मीडियाने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली. या देशात कायद्याने माझ्या परिवाराला व्यापार करण्याचा अधिकार आहे. माझ्याकडे आहे ते सर्व कागदोपत्री आहे. ज्यांच्या बेनामी संपत्ती आहेत. सोशल मीडियावर लाल गाठोड दाखवत आहेत असे चोर लोकच माझ्याकडे बोट दाखवत आहेत, अशी जहरी टीका मलिक यांनी केली.

भंगारवाला आहे, चोर नाही

मी भंगारवाला आहे… पण चोर नाही अशा रद्दी माझ्याकडे दहा – वीस आणि शंभर टन आहेत. आम्ही चोर नाही… आम्ही डाकूकडून सोनं घेतलं नाही… बँका बुडवल्या नाहीत… त्या वानखेडेशी कुणाचा काय संबंध आहे… कुठल्या हॉटेलचे कोण मालक आहेत… त्या हॉटेलमधील वस्तू क्रुझवर कशा गेल्या… क्रुझवरील कॅटरिंगॉमध्ये ड्रग्ज कसे गेले… आता मी नावं घ्यायला सुरुवात केलेली आहे… इतकं का घाबरताय? असा सवालही त्यांनी केला.

एनसीबीची पोल खोल करतच राहणार

गेल्या अनेक दिवसांपासून ncb बोगस केस तयार करून कारवाई करत आहेत. समीर वानखेडेंनी जवाबदारी स्वीकारल्या नंतर बोगस केस तयार करून पब्लिसिटी करीत होते. पण नंतर हळूहळू हा फर्जीवाडा आम्ही समोर आणला आणि गोसावीच्या सेल्फीनंतर एकएक बाजू उघडत गेली. जे आज बाहेर होते ते जेल मध्ये आहेत. मात्र, मी एनसीबीची पोलखोल करतच राहणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

काशिफ खान विरोधात पुरावे देणार

आर्यनला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले होते. त्याला आधीच जामीन मंजूर व्हायला हवा होता. एनसीबीने फेक कारवाई करण्यासाठी प्रायव्हेट आर्मी तयार केली होती. निष्पाप लोकांना फसवले जात होते. यामध्ये समीर वानखेडेंसोबत काशिफ खानही होता. त्यामुळे येणाऱ्या काळात काशिफ खानविरुद्ध पुरावे सुद्धा देणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

चोरांचा दरोड्याचा नवा पॅटर्न? आता बुलडाण्यात स्टेट बँकेवर दरोडा, 20 लाखांची रोकड लंपास, महाराष्ट्रात 10 दिवसांत 4 बँकांना लक्ष्य

समीर वानखेडेंनी धर्मांतर केल्याचं दिसत नाही, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या उपाध्यक्षांचं मोठं विधान

तो मी नव्हेच! आणखी एका किरण गोसावीचा खुलासा; नवाब मलिक यांचा ‘तो’ दावा खोटा ठरणार?

(nawab malik slams bjp over mumbai cruise party case)