मोठी बातमी! सत्तेला सुरुंग; शिंदे, अजितदादांकडून भाजपचा गेम, सर्वात मोठा धक्का

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ऐन महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानं भाजपला मोठा धक्का दिला आहे. राजकारणात मोठं ट्विस्ट आल्याचं पहायला मिळत आहे.

मोठी बातमी! सत्तेला सुरुंग; शिंदे, अजितदादांकडून भाजपचा गेम, सर्वात मोठा धक्का
ajit pawar, eknath shinde
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 09, 2026 | 4:06 PM

राज्यात सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराला देखील वेग आला आहे.  महाराष्ट्रातील 29  महापालिकांसाठी निवडणुका होणार आहेत. दरम्यान यातील अनेक महापालिका निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती झाली आहे. सध्या सर्व राज्याचं लक्ष हे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे लागलं आहे, कारण मुंबई महापालिका निवडणुकीच्या मैदानात एकीकडे शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती आहे, तर दुसरीकडे या युतीपुढे मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत मोठं आव्हान निर्माण केलं आहे. दरम्यान काही महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती देखील पहायला मिळत आहे. तर ज्या ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गटासोबत युती होऊ शकली नाही, तिथे राष्ट्रवादी अजित पवार गटानं राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत युती केली आहे. दरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत आहे.  ती म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटानं भाजपला मोठा धक्का दिला आहे.

अंबरनाथ नगरपालिकेच्या सत्तास्थापनेत मोठा ट्विस्ट आला आहे. कारण कालपर्यंत भाजपासोबत असलेल्या राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांनी आज अचानक शिवसेनेला समर्थन दिलं आहे. त्यामुळं शिवसेनेची अंबरनाथ पालिकेवरील सत्ता कायम राहणार आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या गेमचेंजर ठरलेल्या या नगरसेवकांमुळे आता भाजपला सत्तेपासून दूर रहावं लागणार आहे.

अंबरनाथ नगरपालिकेत शिवसेना शिंदे गटाचे  सर्वाधिक  27 नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर एका अपक्षाच्या साथीने शिवसेनेचं संख्याबळ 28 वर पोहोचलं होतं. सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला आणखी 2 नगरसेवकांची आवश्यकता असताना, किंगमेकरच्या भूमिकेत असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नगरसेवकांनी भाजपाला साथ दिली होती. त्यात काँग्रेसमधून निलंबित 12 नगरसेवकांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्यानं भाजपाचं संख्याबळ 15 वरून 31 वर पोहोचलं होतं.

सोमवारी 12 जानेवारी रोजी होणाऱ्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाचाच उपनगराध्यक्ष बसेल, असं वातावरण असताना आज गट नोंदणी करण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांनी शिवसेनेला समर्थन दिलं. त्यामुळं आता शिवसेनेचं संख्याबळ 32 झालं असून उपनगराध्यक्ष, विषय समित्या शिवसेनेकडेच राहणार आहेत. त्यामुळं सिंह गेला असला, तरी शिवसेनेनं अंबरनाथचा गड मात्र राखण्यात यश मिळवलंय.

अजित पवार गट नगरसेवक

सदाशिव पाटील
मीरा शेलार
सचिन पाटील
सुनिता पाटील