AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar Death: विमान अपघातातील सहावी व्यक्ती कुठे आहे? राष्ट्रवादीच्या नेत्याच्या 5 सवालाने सर्वच हादरले; दादांच्या कार्यक्रमपत्रिकेतील ती माहिती काय?

Ajit Pawar Death: अपघातात पाच व्यक्तींचे मृतदेह आढळले आहेत, अशात सहावी व्यक्ती कुठे? असा प्रश्न उपस्थित होत असताना, राष्ट्रवादीच्या नेत्याच्या 5 सवालाने सर्वच हादरले आहेत.. दादांच्या कार्यक्रमपत्रिकेतील ती माहिती काय?

Ajit Pawar Death: विमान अपघातातील सहावी व्यक्ती कुठे आहे? राष्ट्रवादीच्या नेत्याच्या 5 सवालाने सर्वच हादरले; दादांच्या कार्यक्रमपत्रिकेतील ती माहिती काय?
Ajit Pawar
| Updated on: Feb 02, 2026 | 12:01 PM
Share

Ajit Pawar Death: महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. दादांच्या अकस्मित निधनानंतर राज्य अद्यापही धक्क्यात असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि अजित पवारांचे जवळचे मानले जाणारे अमोल मिटकरी यांनी दुःख व्यक्त करत पाच प्रश्न उपस्थित केले आहे. अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर आता संशयास्पद बाबींकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या पाच प्रश्नांनंतर घातपात तर नाही ना? अशी चर्चा देखील रंगू लागली आहे.

एक्सवर एक ट्विट करत अमोल मिटकरी यांनी काही फोटो पोस्ट केले आहेत. दादांसोबतच्या आठवणी देखील त्यांनी ताज्या केल्या. दादा गेले हे अजूनही कुणाचंच मन मान्यायला तयार नाही… असं म्हणत अमोल मिटकरी म्हणाले, मृत्यूचे राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही. मात्र हे प्रश्न माझं मन विचारतंय.. सध्या त्यांची पोस्ट व्हायरल होत आहे.

पोस्टमध्ये काय म्हणाले अमोल मिटकरी?

आदरणीय दादा गेले हे अजूनही कुणाचंच मन मानायला तयार नाही. काल देवगिरीवरील त्या दोन खुर्च्या बघून परत डोळे पाणावले… त्यातील पहिली खुर्ची – सामान्य माणसाची कामे वा तक्रार नीट बाजूला बसून ऐकणाऱ्या व्यक्तीची. आणि दुसरी – आदरणीय दादांची!!

मृत्यूच्या अगोदरिल दिवशी दुपारनंतर कुठलाच कार्यक्रम नव्हता. दादा याच ठिकाणी पक्षातील कार्यकर्त्यांना भेटल्याचे काल समजले. दुसऱ्या दिवशी याच खुर्चीवरून कामे आटोपून दादा बारामतीकडे निघाले. गेले तीन दिवस मनात शंकेचं काहूर आहे.

प्रश्नांचा आगडोंब उसळतोय. मृत्यूचे राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही.

मात्र हे प्रश्न माझं मन विचारतंय—

अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले?

सहावी व्यक्ती कुठे गेली?

Take-off आधी प्रवासी यादी digitally नोंदलेली असते, मग विसंगती का?

एकादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही???

एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले?

प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही… असं अमोल मिटकरी पोस्ट करत म्हणाले आहे.

Follow Us
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
Nanded | दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...