AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“माझ्या निवडणुकीचं…”, छगन भुजबळांचा मराठा समाजाबद्दल खळबळजनक खुलासा

आता नाशिकमध्ये समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत छगन भुजबळांनी कार्यकर्त्यांसमोर त्यांच्या भावना व्यक्त केल्या. तसेच त्यांनी एक मोठे आवाहनही केले.

माझ्या निवडणुकीचं..., छगन भुजबळांचा मराठा समाजाबद्दल खळबळजनक खुलासा
छगन भुजबळ नाशिक
| Updated on: Dec 18, 2024 | 3:33 PM
Share

Chhagan Bhujbal On Maratha Community : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना वगळण्यात आले. यामुळे त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. “जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना”, असं सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले होते. त्यातच गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे बंड पुकारु शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आज नाशिकमध्ये समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत छगन भुजबळांनी कार्यकर्त्यासमोर त्यांच्या भावना व्यक्त केल्या. तसेच त्यांनी एक मोठे आवाहनही केले.

आज नाशिकमध्ये होणाऱ्या समता परिषदेच्या बैठकीसाठी राज्यभरातील भुजबळ समर्थक दाखल झाले होते. हे सरकार जातीयवादी असल्याचा आरोप सातत्याने भुजबळ समर्थकांकडून केला जात आहे. ओबीसींसाठी लढणाऱ्या नेत्याला डावललं जात असल्याची भावना भुजबळ समर्थकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे की अजित पवार, तटकरे आणि पटेल प्रायव्हेट लिमिटेड पार्टी आहे, असा प्रश्नही भुजबळ समर्थकांकडून विचारला जात होता. त्यातच आता छगन भुजबळांनी कार्यकर्त्यांसमोर मराठा समाजाबद्दल एक खळबळजनक खुलासा केला आहे.

“मागासवर्गीय, दलित मुस्लिमांचीही तीच अवस्था”

“चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्व आले आहेत. काल मी नाशिकच्या लोकांना भेटलो आणि येवल्याला लासलगावला गेलो. येवला लासलगावमध्ये दुखाची आवकळा आली आहे. त्यांना शॉक बसला. त्यातून बाहेर येत नाही. मी त्यांना धीर देण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांना समजावलं. पण ही गोष्ट फक्त येवला लासलगावची नाही. ही मागासवर्गीय, दलित मुस्लिमांचीही तीच अवस्था आहे”, असे छगन भुजबळ म्हणाले.

“माझ्या विरोधात काम केलेल्या मराठा समाजातील लोकांनाही हे डायजेस्ट झालेलं नाही. असं होऊच शकत नाही असं ते म्हणत आहेत. अख्ख्या देशातून मेसेज येत आहे. पंकज, समीर आणि कार्यकर्ते मेसेजला उत्तर देत आहे. आमच्या शहरात या, जिल्ह्यात या, राज्यात या अशी मागणी सुरू झाली आहे”, असे छगन भुजबळांनी म्हटले.

माझ्या निवडणुकीचं सारथ्य मराठा कार्यकर्त्यांनी केले

कधी कधी अशी घटना घडते, शांत असलेली माणसं पेटून उठतात. तसा प्रकार मला दिसत आहे. आपण पेटून उठला तरी पेटवापेटवी करायची नाही. तुमच्या मनातील दुख जाहीर करा. शिवीगाळ नको, जोडो मार नको. काय गरज नाही. काय चाललं ते त्यांना माहीत असतं. रोज सकाळी ८ वाजता राज्यात काय चाललं त्याची ब्रिफिंग मुख्यमंत्र्यांपासून सर्वांना कळतं. तुम्ही निषेध दाखवता त्यात संयम ठेवा. आपल्यासोबत दलित, मागासवर्गीय, मुस्लिम आहेत. तसे मराठाही आहे. माझ्या निवडणुकीचं सारथ्य मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केलं, असा खुलासा छगन भुजबळांनी केला.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा