छगन भुजबळ अपघातातून थोडक्यात बचावले, पायलटची मोठी चूक, हेलिकॉप्टर हेलिपॅडवर लँड न करता…

मंत्री छगन भुजबळ हे आज पुण्याला महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त हेलीकाप्टर ने मुंबई ते पुण्याचा प्रवास करत होते. दरम्यान, पायलटच्या चुकीमुळे मोठा अपघात होणार होता.

छगन भुजबळ अपघातातून थोडक्यात बचावले, पायलटची मोठी चूक, हेलिकॉप्टर हेलिपॅडवर लँड न करता...
छगन भुजबळ
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Apr 11, 2026 | 1:12 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात टळला आहे. पुण्यातील एका कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी ते मुंबईहून पुण्याला निघाले होते. मात्र, हेलिकॉप्टर नियोजित हेलिपॅडवर उतरवण्याऐवजी गाड्यांच्या पार्किंग क्षेत्रात उतरवण्यात आले. पायलटकडून घडलेल्या या मोठ्या चुकीमुळे एक मोठा अपघात टळला.सुदैवाने या घटनेत छगन भुजबळ यांच्यासह इतर कोणालाही इजा झाली नाही. मंत्री भुजबळ अपघातातून बचावले.

नेमकं काय घडलं?

आज सकाळी मुंबईहून हेलिकॉप्टरने पुण्याकडे निघालेल्या छगन भुजबळ यांच्या विमानाने पुण्यातील नियोजित लँडिंग स्पॉटवर (हेलिपॅड) उतरण्याऐवजी जवळील गाड्यांच्या पार्किंगमध्ये लँडिंग केले. हेलिकॉप्टरचे रोटर्स फिरत असताना पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांना धक्का बसण्याची भीती निर्माण झाली होती. पायलटने केलेल्या या गंभीर चुकीमुळे हेलिकॉप्टर सुरक्षितपणे उतरवण्यात आले, पण संपूर्ण घटना धोकादायक ठरली. मंत्री भुजबळ यांनी या घटनेबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याचे समजते.

महात्मा फुले जयंतीनिमित्त पुण्यात आगमन

छगन भुजबळ हे महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी आले होते. मात्र, त्यांच्या प्रवासातील ही अनपेक्षित घटना चर्चेचा विषय बनली आहे. सध्या या प्रकरणी हेलिकॉप्टर पायलट आणि संबंधित सुरक्षा यंत्रणांकडून अधिक माहिती घेतली जात आहे. पायलटच्या या चुकीमागे तांत्रिक कारण होते की मानवी चूक, याचा तपास सुरू आहे.

Follow Us