‘ओबीसी नेत्यांनी काय चाललंय हे समजून घ्यावं, अन्यथा वादावादीतून समाजात तणाव पसरेल’

सध्या एकत्रित बसून अभ्यास करण्याची गरज आहे. सरकारने कोणाचे आरक्षण कमी करा असे सांगितलेले नाही. | Rohit Pawar

'ओबीसी नेत्यांनी काय चाललंय हे समजून घ्यावं, अन्यथा वादावादीतून समाजात तणाव पसरेल'
रोहित पवार
Follow us
| Updated on: Jan 25, 2021 | 7:12 PM

अहमदनगर: राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आणि ओबीसी (OBC reservation) नेत्यांमध्ये सुरु असलेल्या शाब्दिक युद्धाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. ओबीसी नेत्यांनी सध्या नेमकं काय सुरु आहे, हे समजून घ्यावं. अन्यथा मराठा आणि ओबीसी समाजात तणाव निर्माण होईल, असा सावधानतेचा इशारा रोहित पवार यांनी दिला. (NCP leader Rohit Pawar advice to OBC leaders)

ते सोमवारी अहमदनगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ओबीसी नेत्यांना एकप्रकारे सबुरी बाळगण्याचा सल्ला दिला. सध्या एकत्रित बसून अभ्यास करण्याची गरज आहे. सरकारने कोणाचे आरक्षण कमी करा असे सांगितलेले नाही. ओबीसी नेत्यांनी सध्या काय चाललंय, मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार कशाप्रकारे सर्वोच्च न्यायालयात लढत आहे, हे समजून घेतले पाहिजे. उगाच व्हॉटसअ‍ॅप किंवा कोणी बोललं म्हणून निर्णय घेतला तर दोन समाजांमध्ये ताण निर्माण होईल, असे रोहित पवार यांनी सांगितले.

जालन्यात ओबीसी समाजाचा महामोर्चा

ओबीसी समाजाची (OBC Marcha) स्वतंत्रपणे जनगणना व्हावी, या मागणीसाठी रविवारी जालन्यात महामोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा कुणाच्याही विरोधात नाही. हा फक्त आमच्या हक्कासाठी आहे. ओबीसी नेत्यांच्या स्वतंत्र जनगणना करावी, अशी मागणी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.

तुम्ही निवेदन दिलं की मी ते प्रश्न सातत्याने मांडत आहे. मी पक्ष, धर्म, जातपात सोडून मी फक्त ओबीसी म्हणून लढत आहे. जो ओबीसी की बात करेगा वो ही देश पे राज करेगा. ही प्रेरणा भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडून मिळाली. ते आज हयात नाहीत. त्यांनी केलेल्या संघर्षाला सलाम केलं पाहिजे. मंत्री छगन भुजबळ यांनीही धुरा हाती घेतली ते ही लढत राहिले, हे ओबीसींच्या हक्कसाठी लढणारे नेते आहेत. भविष्यात कशाचीही पर्वा न करता संघर्ष करणार असल्याचेही वडेट्टीवार यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

मंत्रालयात झारीतले शुक्राचार्य खूप, OBC आरक्षणावर गदा येत असेल तर लढावंच लागेल : छगन भुजबळ

तरीही काही लोक आमच्यात अतिक्रमण करतायत: विजय वडेट्टीवार

जो ओबीसी की बात करेगा वो ही देश पे राज करेगा : विजय वडेट्टीवार

राज्यात ओबीसी मुख्यमंत्री हवा, जनगणनेसाठी ओबीसींचा राज्यभर एल्गार

(NCP leader Rohit Pawar advice to OBC leaders)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.