नकलीपणाच्या ‘त्या’ आरोपावर रोहित पवारांचे निलेश राणेंना प्रत्युत्तर, म्हणाले…

कोणत्याही बातमीवरुन निष्कर्ष काढताना त्याचा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. | Rohit Pawar

नकलीपणाच्या 'त्या' आरोपावर रोहित पवारांचे निलेश राणेंना प्रत्युत्तर, म्हणाले...
निलेश राणे यांनी ते ट्विट घाईघाईत केले असावे. मी अभ्यास करुनच बोलतो. कोणत्याही बातमीवरुन निष्कर्ष काढताना त्याचा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे.
Follow us
| Updated on: Jan 25, 2021 | 6:38 PM

अहमदनगर: रोहित पवार यांची कृषी कायद्यांविषयीची भूमिका दुटप्पी आणि नकलीपणाची असल्याचा आरोप भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केला होता. त्यांच्या या आरोपाला रोहित पवार (Rohit Pawar) यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. निलेश राणे यांनी ते ट्विट घाईघाईत केले असावे. मी अभ्यास करुनच बोलतो. कोणत्याही बातमीवरुन निष्कर्ष काढताना त्याचा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. मात्र, निलेश राणे यांनी केवळ बातमीच्याआधारे ट्विट केले, असे रोहित पवार यांनी म्हटले. (NCP leader Rohit Pawar on Nilesh Rane tweet)

ते सोमवारी अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मी शेती विषयात अनेक वर्षांपासून काम करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांबद्दल माझी भूमिका मी सविस्तर मांडत असतो. शेतकरी हिताच्या गोष्टी मी करतो, त्याविषयी लपवालपवी करत नाही. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग योग्य पद्धतीने केले तर शेतकऱ्याचा फायदा होतो. मात्र केंद्र सरकारने केलेल्या कायद्यात जाचक अटी असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

निलेश राणेंचा आरोप काय?

शेतकरी आंदोलनावर भाष्य करुन एकीकडे शेतकऱ्यांना भडकवायचं आणि दुसरीकडे तुमच्याच कंपनीने कंत्राटी शेतीचे फायदे सांगायचे. नकलीपणा काय असतो हे बघा आता, अशा शब्दांत निलेश राणे यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला होता.

नकलीपणा काय असतो बघायचं असेल तर हे वाचा. जे रोहित पवार शेतकरी कायद्यांचा संदर्भ देऊन शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच रोहित पवारांची स्वतःची कंपनी शेतकऱ्यांना करार करण्याचे फायदे सांगत आहेत”, असं म्हणत रोहित पवार यांच्या बारामती अ‌ॅग्रोचा फ्लेक्स निलेश राणे यांनी ट्विट केला होता.

संबंधित बातम्या:

असा राज्यपाल पाहिला नाही, त्यांना कंगनाला भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांना भेटायला नाही : शरद पवार

रोहित पवारांनी नकलीपणा केला, कथित पुराव्यासह निलेश राणेंचा हल्ला

(NCP leader Rohit Pawar on Nilesh Rane tweet)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.