‘बूट काय, बुटाखालील माती पण खाईल’, राष्ट्रवादीच्या एका नेत्याचा दुसऱ्या नेत्यावर जोरदार प्रहार
"म्हणून हे राष्ट्रवादीत परत आले. बूट चाटून कधी राजकारण करू नये असे म्हणतात, पण ती व्यक्ती बूट काय, बुटाखालील माती पण खाईल" अशा शब्दात अजिंक्यराणा पाटील यांनी टीका केली.

“कुत्रं परत येतंय म्हणून अजितदादांनी यांना परत गाडीखाली (पक्षात) घेतले. त्यांना कोणीही कोणत्याही पक्षात घेतले नाही, म्हणून हे राष्ट्रवादीत परत आले” अशी टीका अजिंक्यराणा पाटील यांनी केले. अजिंक्यराणा पाटील हे अनगरचे माजी सरपंच आहेत. माजी आमदार राजन पाटील विरुद्ध उमेश पाटील गटातील शाब्दिक वाद सुरूच आहे. अजिंक्यराणा पाटील हे राजन पाटलांचे पुत्र आहेत. उमेश पाटलांचे नाव न घेता अजिंक्यराणा पाटील यांनी सडकून टीका केली. राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्या घरवापसीनंतर पक्षांतर्गत धुसफूस कायम आहे.
“कुत्रं परत येतंय म्हणून अजितदादांनी यांना परत गाडीखाली (पक्षात) घेतले. त्यांना कोणीही कोणत्याही पक्षात घेतले नाही म्हणून हे राष्ट्रवादीत परत आले. बूट चाटून कधी राजकारण करू नये असे म्हणतात, पण ती व्यक्ती बूट काय, बुटाखालील माती पण खाईल” अशा शब्दात अजिंक्यराणा पाटील यांनी टीका केली.
‘बैलगाडीखालील कुत्रं अशी उपमा दिलेली’
माजी आमदार राजन पाटील यांचे पुत्र अजिंक्यराणा पाटील यांची उमेश पाटलांवर खोचक टीका. विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांनी उमेश पाटलांना बैलगाडीखालील कुत्रं अशी उपमा दिली होती. त्यानंतर उमेश पाटलांनी शरद पवार गटाचे उमेदवार राजू खरे यांचा प्रचार केला होता. काही दिवसापूर्वी उमेश पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटात परतले आहेत. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि उमेश पाटील यांच्यात स्थानिक पातळीवर संघर्ष आहे. आता दोन्ही नेते पुन्हा एकाच पक्षात आहेत. त्यामुळे एकाच म्यानात दोन तलवारी किती दिवस राहणार? आणि त्यांना अजितदादा कसं संभाळणार? हा खरा मुद्दा आहे.