
“सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माझ्यासह सर्वांची भूमिका राहिली आहे, अशा प्रकारचे विमान अपघात घडतात त्यावेळी स्वायत्त तपास यंत्रणा भारत सरकारने स्थापन केलेली आहे. पहिल्या दिवशी त्या खात्याच्या केंद्रीय मंत्री महोदयानी चौकशी केली. मुख्यमंत्र्यांनी सीआयाडी चौकशीचे आदेश दिले तशी चौकशी सुरु झाल्याची माहिती देण्यात आली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, आम्ही मुख्यमंत्री महोदयांना भेटलो. पक्षाच्या वतीने निवेदन दिलं. या सर्व घटनेची सीबीआय चौकशी केली जावी. दुसऱ्याचदिवशी मुख्यमंत्र्यांनी पत्र व्यवहार केला” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे बोलले.
“जे काही सत्य आहे, वेगवेगळ्या व्यक्तींनी घटना त्याबद्दल काही प्रश्न निर्माण केलेत. काहींनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी आणि वरिष्ठ सहकाऱ्यांची भूमिका राहिली आहे, यंत्रणेमार्फत तपास होत असताना ज्या बाबी उपस्थित झाल्यात, त्या बाबींसह तपास सखोलतेने व्हावा. जागतिक स्तरावरील अशा अपघाताची चौकशी करण्यासाठी संस्था आहेत. त्यांची मदत घेतली जावी. दादांच्या दु:खद निधनाने महाराष्ट्रच नाही, देश दु:खात आहे. प्रचंड हळहळ व्यक्त होतेय. म्हणून हा सर्व अहवाल महाराष्ट्रासह देशातील जनतेसमोर यावा अशी मागणी आहे” असं सुनील तटकरे बोलले.
मी गेली 35 वर्ष सार्वजनिक जीवनात आहे
ज्या पद्धतीने यंत्रणा तपास करतायत न्याय मिळणार नाही असं रोहित पवारांना वाटतं, त्यावरही सुनील तटकरे बोलले. “कोणाला काय वाटतय त्या बद्दल मी भाष्य करणार नाही. मी गेली 35 वर्ष सार्वजनिक जीवनात आहे. ज्या काही शंका, प्रश्न आहेत, ते तपास यंत्रणांनी समजून घ्यावेत.त्या अनुषंगाने तपास करावा, त्यात कुठल्याही त्रुटी राहू नयेत” असं सुनील तटकरे म्हणाले.
..तर त्यावर बोलणार नाही
“माझा आणि दादांचा परिचय 1991 पासूनचा आहे. 1999 साली मी दादांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मी 1984 पासून राजकारणात आहे. तिथूपासून दादांसोबत जीवभावाची साथ होती. ती साथ विश्वासाने केली. त्यांनी अनेक ठिकाणी काम करण्याची संधी दिली. आत्ताचं नाही, राष्ट्रवादी एकसंध असताना 2014-18 दरम्यान मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होतो. दादांच्या आदेशानुसार लोकसभा लढलो. विधानसभेत यश मिळालं. दादांचं निधन संपूर्ण देशाला चटका लावणारं ठरलं. दादांच्या उत्तराधिकारी म्हणून वहिनींनी जबाबदारी घ्यावी असं मला आणि सहकाऱ्यांना वाटलं. त्यावर इतर कुणी टिका-टिप्पणी करत असेल तर बोलणार नाही” असं सुनील तटकरे म्हणाले.