AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्ही देखणे नाही का? च्या आयला आमचीच बिनपाण्याने… तुला बघतोच ये माझ्याकडे… अजितदादांनी उडवली सूत्रसंचालकाची टोपी

इस्लामपूरमध्ये महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन.डी. पाटील विधी महाविद्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला, या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं.

आम्ही देखणे नाही का? च्या आयला आमचीच बिनपाण्याने... तुला बघतोच ये माझ्याकडे... अजितदादांनी उडवली सूत्रसंचालकाची टोपी
| Updated on: Aug 16, 2025 | 3:45 PM
Share

इस्लामपूरमध्ये महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन.डी. पाटील विधी महाविद्यालयाचा उद्घाट कार्यक्रम तसेच  श्रीमती सरोज नारायण पाटील (माई) मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्रा. डॉ. एन. डी. पाटील बहुउद्देशीय सभागृहाचा उद्घाटन सोहळा पार पडला, या कार्यक्रमामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केल्याचं पहायला मिळालं.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व म्हणजे जयंत पाटील आता बोलायला उभं राहातील असं कार्यक्रमाच्या सूत्रसंचकाने म्हटलं, यावरून अजित पवार यांनी सूत्रसंचालकाची जोरदार फिरकी घेतली.

नेमकं काय म्हणाले अजित पवार? 

सूत्रसंचलाकांनी सांगितलं. आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व जयंतराव पाटील. आम्ही काय देखणे नाही का. च्या आयला वाळव्याला बोलवायचं, इथं बोलवायचं आणि आमचीच बिनपाण्याने करायची. ते देखणे आणि आम्ही काय बिन देखणे आहोत? तुला बघतोच ये माझ्याकडे कसं काय येतोय, असं यावेळी अजित पवार यांनी म्हटलं, सोबतच त्यांची चौफेर फटकेबाजी केल्याचं देखील पाहायला मिळालं.

मी भाषण करत नाही, मी कामाचा माणूस आहे. एक गोष्ट खरी आहे आत्यांनी सांगितलेली जसं मी जन्माला आलोय, तसं मी माई आत्यांना माई म्हणत आलोय. त्यामुळे मी सरोज पाटील, माईसाहेब वगैरे म्हणणार नाही. वास्तविक मी पाहत होतो, रोहित सारखा माई माई करत होता. त्याची आजी आहे, तरी माई माई करतोय. ठिक आहे, बघतो घरी गेल्यावर काय आहे ते असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं.

एनडी मामांना आम्ही एनडी मामा म्हणायचो. मला या कार्यक्रमाचं आमंत्र आलं. संगिता आणि प्रशांत आमंत्रण घेऊन आले होते. आम्ही परिवारातील आहोत. अधूनमधून भेटत असतो. आम्ही सुखदुखात सामील होतो. मी संगिता आणि प्रशांतला विचारलं काय काढलं. त्यावर त्यांनी मला याबाबत माहिती दिली, असंही यावेळी अजित पवार म्हणाले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...