‘नगर जिल्ह्यात दरोड्यांच्या आणि बुवाबाजीच्या प्रकारांमध्ये मोठी वाढ’, निलम गोऱ्हे यांचं पोलीस महानिरीक्षकांना पत्र

| Updated on: Dec 22, 2020 | 12:20 AM

अहमदनगर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दरोड्यांचं प्रमाण वाढलं आहे. ते आटोक्यात आणण्यासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याची मागणी विधान परिषदेच्या उपसभापती नामदार निलम गोऱ्हे यांनी केली आहे.

नगर जिल्ह्यात दरोड्यांच्या आणि बुवाबाजीच्या प्रकारांमध्ये मोठी वाढ, निलम गोऱ्हे यांचं पोलीस महानिरीक्षकांना पत्र
nilam gorhe
Follow us on

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दरोड्यांचं प्रमाण वाढलं आहे. ते आटोक्यात आणण्यासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याची मागणी विधान परिषदेच्या उपसभापती नामदार निलम गोऱ्हे यांनी केली आहे. याविषयी त्यांनी नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांना पत्रही लिहिलं आहे. यात त्यांनी नगर नाशिक परिसरात नुकत्याच अटक झालेल्या बुवाप्रमाणे अनेक नावांनी वावरणाऱ्या अन्य एका बुवाबाजी करणाऱ्या गुन्हेगारावरही कारवाई करण्याची मागणी केलीय. हा गुन्हेगार जमिनीतून सोने काढून देतो असं सांगत लोकांची फसवणूक करत असल्याची माहिती गोऱ्हे यांनी दिलीय (Neelam Gorhe demand action of Robber in Ahmednagar).

‘दरोड्यांमधील आरोपींवर कडक कारवाई करा’

निलम गोऱ्हे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे, “अहमदनगर जिल्ह्यात दरोडा, महिला अत्याचाराच्या प्रमाणात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. कोठेवाडी असो कोपर्डी येथील घटनांचा मागोवा घेतला तर अशा घटनांवर निर्बंध आणण्यासाठी पोलीस प्रशासनास विशेष प्रयत्न करणे आवश्यक वाटत आहे. रविवारीच (20 डिसेंबर) पहाटे श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळा गावात दरोडा पडल्याची घटना समोर आली. दरोडेखोरांनी विमल जाधव या ज्येष्ठ महिलेच्या घरातील 50 हजारांचा ऐवज चोरला. त्यांच्या कानातील दागिने खेचल्याने दोन्ही कानाच्या पाळ्या तुटल्या. यात जाधव आजी चांगल्याच जखमी झाल्या आहेत.”

“घरात महादेव जाधव आणि विमल जाधव हे ज्येष्ठ दामप्त्य होते. सुरुवातीला दरोडेखोरांनी घराची कडी वाजवली. प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजा उघडण्यासाठी धमकावले. शेवटी दरवाजा उघडला गेला. दरोडेखोरांनी आत येताच विमल जाधव यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या अंगावरील दागिने हिसकावू लागले. विमल यांनी कानातील दागिने काढून देण्यास विरोध केला. त्यामुळे दरोडेखोरांनी कानातील दागिने पकडून जोरात हिसकावले. त्यामुळे जाधव यांच्या कानाच्या दोन्ही पाळ्या तुटल्या. दरोडेखोरांनी कानातील आणि गळ्यातील दागिनेही हिसकावून नेले असल्याचे समोर आले आहे,” असंही निलम गोऱ्हे यांनी नमूद केलं.

‘भोंदू बुवांकडून होणाऱ्या फसवणुकीवर कारवाई करा’

निलम गोऱ्हे यांनी भोंदू बुवांवरही कारवाईची मागणी केलीय. त्या म्हणाल्या, “जमिनीतून सोने काढून देतो, भरपूर धनलाभ करुन देण्याचे आमिष भक्तांना दाखवणार्‍या भोंदूबुवाला अखेर पोलिसांनी अटक केली. अशी अनेक प्रचलित नावे वापरुन फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी. तसेच असे बुवा महिलांना लवकर जाळ्यात ओढत असतात. त्यातून महिलांवर अत्याचार झालेले प्रकार आपण यापूर्वी देखील पाहिले आहे. असे असताना या बुवाने महिलांवर देखील अत्याचार केले आहेत का? या संदर्भात पोलिसांनी महिलांना आवाहन करावं आणि या भोंदू व्यक्तीने जर कोणत्या महिलेवर अत्याचार केला असेल तर त्यांना पोलिसांना संपर्क करावी. पीडित महिलांची नावं गुप्त ठेवण्यात यावीत.”

कारवाईबाबत निलम गोऱ्हेंच्या पोलिसांना सूचना

1. या दरोडेखोरांचा सतत वावर हा नाशिक, औरंगाबाद, नगर आणि बीड या जिल्ह्यात सुरू असतो. दरोड्यांच्या घटना भविष्यात घडू नये, दरोडेखोरांचा नायनाट करण्यासाठी नगर दरोडेखोर विरोधी जिल्ह्यात विशेष पोलीस पथकाची स्थापन करावी.

2. या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी पूर्वीच्या दरोड्यांच्या घटनांमध्ये आणि या घटनेत काय साम्य आहे याचा अभ्यास करावा. जेणेकरून दरोड्यांच्या कार्यपध्दतीवरून आरोपींना अटक करण्यास मदत होईल.

4. दरोडेखोरांकडून गावाशेजारील वस्त्यांना लक्ष केलं जात आहे. अशा वस्त्यांना गावाशी अथवा पोलीस स्थानकाशी जोडण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात याव्यात.

5. समाजकंटक, दरोडेखोर यांना संरक्षण देणाऱ्या काही प्रवृत्ती या जिल्ह्यात आहेत. दरोडेखोरांच्या मुळाशी जाऊन अशा समाजकंटकांवर देखील कारवाई होणे आवश्यक आहे.

हेही वाचा :

“अपयश झाकण्यासाठी शिवसेनेवर टीका, ही तर भाजपची केविलवाणी धडपड”

कधी महिला, तर कधी पत्रकारांना पुढं करुन मुख्यमंत्र्यांचा एकेरी उद्धार, मग हे जिव्हारी का लागलं? : नीलम गोऱ्हे

‘अमृताताई नावातील ‘अ’ मृतावस्थेत जाऊ देऊ नका, मानसिक स्वास्थ जपा’, नीलम गोऱ्हे यांचे चिमटे

Neelam Gorhe demand action of Robber in Ahmednagar