कधी महिला, तर कधी पत्रकारांना पुढं करुन मुख्यमंत्र्यांचा एकेरी उद्धार, मग हे जिव्हारी का लागलं? : नीलम गोऱ्हे

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत ईडी चौकशांवरुन भाजपला दिलेल्या इशाऱ्यावर राजकारण चांगलंच तापलं आहे.

कधी महिला, तर कधी पत्रकारांना पुढं करुन मुख्यमंत्र्यांचा एकेरी उद्धार, मग हे जिव्हारी का लागलं? : नीलम गोऱ्हे
Follow us
| Updated on: Nov 28, 2020 | 5:05 PM

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत ईडी चौकशांवरुन भाजपला दिलेल्या इशाऱ्यावर राजकारण चांगलंच तापलं आहे. तुम्ही चौकशा लावून सुडचक्र वापरणार असाल, तर आमच्याकडेही सुदर्शन चक्र आहे. वेळ आल्यास आम्ही ते मागे लावू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. यानंतर भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजपला धमकी देत असल्याचा आरोप केला. यावर आता शिवसेना उपनेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भाजपला चांगलंच फैलावर घेतलंय. भाजपच्या फौजा कधी महिलांना, तर कधी पत्रकारांना पुढं करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उद्धार करता, मग हा इशारा इतका जिव्हारी का लागला? असा सवाल नीलम गोऱ्हे यांनी विचारला (Shivsena leader Neelam Gorhe criticize Devendra Fadnavis and BJP).

भाजपची फौज कधी महिला, तर कधी पत्रकार यांना पुढे करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केवळ एकेरी भाषेत टीका करत नाहीत, तर अगदी उद्धार करतात. मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फक्त प्रांजळ घणाघात केला, तर त्यांचे म्हणणे फडणवीस आणि भाजपच्या एवढे कां जिव्हारी लागले? मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख होत असताना तेव्हा राधासुता कुठे गेला होता तुमचा धर्म? असा सवाल नीलम गोर्हे यांनी विचारला.

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “भाजप नामदार उद्धव ठाकरे यांनी धमकी दिल्याचा दावा करत आहे, पण भाजप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काय बोलत होतं? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषेला अशोभनीय म्हटले याबद्द्ल आश्चर्य वाटलं. कदाचित फडणवीस आणि भाजपच्या इतर नेत्यांची साम दाम दंड भेदाची भाषा विद्यमान मुख्यमंत्र्यांनी आत्मसात न केल्याने त्यांना उद्धव ठाकरेंची सुसंस्कृत आणि अरेला कारे करण्याची रोखठोक मर्हाठी पण संस्कारात्मक भाषा अशोभनीय वाटली असावी.”

विरोधी पक्षनेत्यांची कीव करावी की त्यांच्या असहाय्यतेबद्दल त्यांच्यावर सहानुभूती व्यक्त करावी असा प्रश्न पडल्याचाही टोला नीलम गोऱ्हे यांनी भाजपला लगावला.

संबंधित बातम्या :

‘राम मंदिरासाठी बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान अविस्मरणीय’, चांदीची वीट स्वीकारताना राम मंदिर न्यासचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंदगिरी यांचे उद्गार

‘अमृताताई नावातील ‘अ’ मृतावस्थेत जाऊ देऊ नका, मानसिक स्वास्थ जपा’, नीलम गोऱ्हे यांचे चिमटे

चित्रपटांचे अनुदान दीर्घकाळ प्रलंबित, नाट्यकर्मींसाठी शासनाच्या विविध विभागांचे एकत्र प्रयत्न गरजेचे : नीलम गोऱ्हे

संबंधित व्हिडीओ : 

Shivsena leader Neelam Gorhe criticize Devendra Fadnavis and BJP

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.