‘राम मंदिरासाठी बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान अविस्मरणीय’, चांदीची वीट स्वीकारताना राम मंदिर न्यासचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंदगिरी यांचे उद्गार

राम मंदिराच्या बांधकामासाठी चांदीची वीट देण्याची इच्छा विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे आणि शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आली होती. ही चांदीची वीट दिवाळी पर्वकाळात आणि बलिप्रतिपदेच्या पूर्वसंध्येला म्हणजे गोवर्धनपूजेला अयोध्येतील राम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्याकडे सोपवण्यात आली.

'राम मंदिरासाठी बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान अविस्मरणीय', चांदीची वीट स्वीकारताना राम मंदिर न्यासचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंदगिरी यांचे उद्गार
Follow us
| Updated on: Nov 16, 2020 | 3:31 PM

पुणे: अयोध्येतील राम मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि शिवसेनेकडून एक चांदीची वीट अर्पण करण्यात आली आहे. राम मंदिराचे पुणे येथील ट्रस्टी स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्याकडून ही वीट सुपूर्द करण्यात आली. अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन झाल्यानंतर मंदिराच्या पुनर्बांधणीचं काम वेगात सुरु आहे. मंदिराच्या बांधकामासाठी चांदीची वीट देण्याची इच्छा विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे आणि शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आली होती. ही चांदीची वीट दिवाळी पर्वकाळात आणि बलिप्रतिपदेच्या पूर्वसंध्येला म्हणजे गोवर्धनपूजेला अयोध्येतील राम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्याकडे सोपवण्यात आली. (Shiv Sena hands over silver bricks for Ram temple in Ayodhya)

“अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराकडे संपू्र्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. हे मंदिर भव्यदिव्य असणार आहे. तसंच मंदिरासाठी अनेकांनी आजवर पुढे येऊन काम केले आहे. अयोध्येच्या श्री राम मंदिरासाठी सर्वस्व पणाला लावणारे आणि सातत्याने भूमिका मांडणारे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिर उभारणीसाठी केलेले कार्य कायम सर्वांच्या स्मरणात राहील. त्यांच्या योगदानस्मृती देण्यात आलेल्या चांदीच्या विटेचा आपण स्वीकार करत आहोत”. अशा शब्दात स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती जागवल्या आणि चांदीच्या विटेचा स्वीकार केला.

दरम्यान, स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या लॉकडाऊन काळातील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या प्रवचनाच्या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले. तसंच स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या इथं आयोजित केलेल्या पूजेचं दर्शन घेतलं.

चांदीच्या वीटेवरील मजकूर

|| श्री गणेशाय नम: || हिंदूहृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे* यांच्या स्वप्नानुसार अयोध्येमध्ये राम मंदिरासाठी *महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.उद्धवजी ठाकरे यांच्या प्रेरणेने व सौ.रश्मी, ना.आदित्य,श्री.तेजस ठाकरे यांच्या सहकार्याने प्रभू रामचंद्रांच्या चरणाशी एक खारीचा वाटा अर्पण करीत आहे. श्रद्धापूर्वक वंदन . ना.डॉ. नीलम गोऱ्हे उपसभापती, महाराष्ट्र राज्य कै.दिवाकर व लतिकाताई गोऱ्हे परिवार, जेहलम जोशी शके १९४२, संवत २०७७ आरंभ, बलिप्रतिपदा, दि.१६ नोव्हेंबर, २०२०

संबंधित बातम्या:

‘राम मंदिर ट्रस्टची निर्मिती अवैध’! निर्वाणी आखाडाचे महंत धर्मदास यांचा आरोप, गृह मंत्रालयाला कायदेशीर नोटीस

राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो तर मराठा आरक्षणाचा का नाही?; अशोक चव्हाणांचा थेट सवाल

Shiv Sena hands over silver bricks for Ram temple in Ayodhya

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.