AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो तर मराठा आरक्षणाचा का नाही?; अशोक चव्हाणांचा थेट सवाल

या देशात कलम 370 आणि राम मंदिराचा प्रश्न सुटू शकत असेल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न का सुटू शकत नाही?; असा सवाल सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला.

राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो तर मराठा आरक्षणाचा का नाही?; अशोक चव्हाणांचा थेट सवाल
| Updated on: Oct 30, 2020 | 6:09 PM
Share

परभणी: या देशात कलम 370 आणि राम मंदिराचा प्रश्न सुटू शकत असेल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न का सुटू शकत नाही?; असा सवाल सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. (if ram mandir issue can solved then why not maratha reservation?: ashok chavan)

अशोक चव्हाण हे परभणी येथे एमआयडीसी भागातील व्यंकटेश मंगल कार्यालयात काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला संबोधित करताना त्यांनी हा सवाल केला. या देशात कलम 370 आणि राम मंदिराचा प्रश्न सुटू शकत असेल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न का सुटू शकत नाही? मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटण्यासाठी दिल्लीतील नेत्यांनी सकारात्मकता दाखवली पाहिजे, अशी आशा अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.

मराठा आरक्षणावर सरकार गंभीर नसल्याचा आरोप होत आहे. मुळात हा आरोप राजकीय आहे. भाजपवाले यात विषयात घुसले असून त्यांनीच मराठा आरक्षणावर सरकार गंभीर नसल्याची बोंब उठवली आहे. खरे तर सरकार मराठा आरक्षणावर गंभीर असून कामही करत आहे. हा प्रश्न खंडपीठाकडे ठेवून चालणार नाही. तो घटनापीठाकडे असावा, असं आमचं म्हणणं होतं, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीतील काँग्रेस नेते शिवसेनेसोबत युती करण्यास अनुकूल नव्हते. पण राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या आग्रहामुळे महाविकासआघाडी प्रत्यक्षात आली, असा गौप्यस्फोटही चव्हाण (Ashok Chavan) यांनी केला. दिल्लीतील काँग्रेसचे नेते शिवसेनेसोबत युती करायची की नाही, या संभ्रमात होते. पण भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेबरोबर आघाडी करावी, असे राज्यातील काँग्रेस नेत्यांचे मत होते. भाजपने काँग्रेस संपवण्याचे काम सुरु केले होते. त्यामुळे काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत येण्यास तयार झाला, असेही त्यांनी सांगितलं.

यावेळी चव्हाण यांनी मोदी सरकारच्या कृषी सुधारणा कायद्यांवरही टीकास्त्र सोडले. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना सवय लागेपर्यंत व्यापारी हवे तेवढे पैसे देतील. पण दोन-चार वर्षानंतर या कायद्यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक सुरु होईल. त्यामुळे महाराष्ट्रात हा कायदा लागू होऊ, अशी काँग्रेसची विनंती आहे. विशेष गोष्ट म्हणजे कंगना रनौत आणि दिलेर मेहंदी हा कायदा योग्य असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे भाजपची नेमकी भूमिका काय आहे, हे कळायला मार्ग नाही. भाजपवाले कंगनाला कुठपर्यंत नेणार, हे माहिती नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली. (if ram mandir issue can solved then why not maratha reservation?: ashok chavan)

संबंधित बातम्या:

दिल्लीतील नेते शिवसेनेसोबत जाण्यास अनुकूल नव्हते: अशोक चव्हाण

विधानसभेपूर्वी काँग्रेसला रामराम, अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत बड्या नेत्याची पक्षात घरवापसी

काँग्रेसने देशाची माफी मागावी, पुलवामाबाबत पाक मंत्र्यांच्या वक्तव्यानंतर जावडेकरांचा घणाघात

(if ram mandir issue can solved then why not maratha reservation?: ashok chavan)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.