दिल्लीतील नेते शिवसेनेसोबत जाण्यास अनुकूल नव्हते: अशोक चव्हाण

भाजपने काँग्रेस संपवण्याचे काम सुरु केले होते. | Ashok Chavan

दिल्लीतील नेते शिवसेनेसोबत जाण्यास अनुकूल नव्हते: अशोक चव्हाण
Follow us
| Updated on: Oct 30, 2020 | 5:57 PM

परभणी: विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीतील काँग्रेस नेते शिवसेनेसोबत युती करण्यास अनुकूल नव्हते. पण राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या आग्रहामुळे महाविकासआघाडी प्रत्यक्षात आली असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केला. दिल्लीतील काँग्रेसचे नेते शिवसेनेसोबत युती करायची की नाही, या संभ्रमात होते. पण भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेबरोबर आघाडी करावी, असे राज्यातील काँग्रेस नेत्यांचे मत होते. भाजपने काँग्रेस संपवण्याचे काम सुरु केले होते. त्यामुळे काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत येण्यास तयार झाला, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. (Ashok Chavan on alliance with shivsena after Maharashtra assembly Election)

विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकणारे परभणीतील बडे नेते सुरेश नागरे यांनी पक्षात घरवापसी केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. काँग्रेस कमिटीच्या बैठकीसाठी अशोक चव्हाण परभणीत होते.

परभणी शहरातील एमआयडीसी भागातील व्यंकटेश मंगल कार्यालयात बैठक झाली. जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसींच्या पदाधिकाऱ्यांना अशोक चव्हाणांच्या हस्ते नियुक्त पत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी सुरेश नागरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

यावेळी अशोक चव्हाण यांनी मोदी सरकारच्या कृषी सुधारणा कायद्यांवरही टीकास्त्र सोडले. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना सवय लागेपर्यंत व्यापारी हवे तेवढे पैसे देतील. पण दोन-चार वर्षानंतर या कायद्यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक सुरु होईल. त्यामुळे महाराष्ट्रात हा कायदा लागू होऊ, अशी काँग्रेसची विनंती आहे.  विशेष गोष्ट म्हणजे कंगना रनौत आणि दिलेर मेहंदी हा कायदा योग्य असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे भाजपची नेमकी भूमिका काय आहे, हे कळायला मार्ग नाही. भाजपवाले कंगनाला कुठपर्यंत नेणार, हे माहिती नाही, अशी टिप्पणीही अशोक चव्हाण यांनी केली.

‘मराठवाड्याला जास्त निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार’ सत्तेत असताना आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे, या मताचा मी आहे. पण दुर्दैवाने कोरोनामुळे 30 टक्केच निधी मिळाला, पण मराठवाड्याला अधिकचा निधी देण्याची माझी भूमिका असल्याची ग्वाही यावेळी अशोक चव्हाण यांनी दिली.

संबंधित बातम्या:

विधानसभेपूर्वी काँग्रेसला रामराम, अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत बड्या नेत्याची पक्षात घरवापसी

धुळ्यात राष्ट्रवादीत इनकमिंग सुरु, अनिल गोटेंच्या नेतृत्वात नेत्याचा पक्षप्रवेश

महाविकासआघाडी सरकार अपघाताने एकत्र – प्रविण दरेकर

(Ashok Chavan on alliance with shivsena after Maharashtra assembly Election)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.