AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET Paper Leak: मोठी बातमी! ‘झुकेगा नही साला’ म्हणणारे CBI समोर झुकले, मोटेगावकरचा Video व्हायरल

NEET Paper Leak: 'झुकेगा नही साला...' RCC चे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या अटकेनंतर जुनी रील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. या रीलमुळे लोक त्यांना प्रचंड ट्रोल करत आहेत.

NEET Paper Leak: मोठी बातमी! 'झुकेगा नही साला' म्हणणारे CBI समोर झुकले, मोटेगावकरचा Video व्हायरल
Shivraj MategaonkarImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 19, 2026 | 3:14 PM
Share

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट (NEET) पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) लातूर आणि नांदेड येथील प्रसिद्ध ‘आरसीसी’ (RCC) क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना अटक केली आहे. मोटेगावकर यांच्या अटकेनंतर शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असतानाच, आता समाज माध्यमांवर (Social Media) त्यांचे काही जुने व्हिडीओ आणि रील जोरदार व्हायरल होऊ लागले आहेत. यामध्ये त्यांचा ‘पुष्पा’ चित्रपटाच्या स्टाईलचा एक व्हिडीओ सध्या नेटीझन्सचे प्रचंड लक्ष वेधून घेत आहे.

‘किंग ऑफ केमिस्ट्री’ची ती रील चर्चेत

शिवराज मोटेगावकर हे परिसरात ‘किंग ऑफ केमिस्ट्री’ (King of Chemistry) या टॅगलाईनने ओळखले जातात. त्यांच्या याच अधिकृत टॅगलाईनखाली काही महिन्यांपूर्वी बनवलेली एक रील आता त्यांच्या अटकेनंतर पुन्हा समोर आली आहे. दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या अत्यंत गाजलेल्या ‘पुष्पा’ चित्रपटातील संवादांवर आधारित ही रील आहे. या व्हायरल रीलमध्ये मोटेगावकर ‘पुष्पा’ स्टाईलमध्ये संवाद साधताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये ते म्हणतात की, “आरसीसी समझके फ्लॉवर समझे क्या… आरसीसी मे तो हर कोई फायर है! ऑफलाईन रेहने दो, ऑनलाईन रेहने दो… झुकेगा नही साला!”

नेटीझन्सकडून जोरदार ट्रोलिंग

सीबीआयने मोटेगावकर यांना बेड्या ठोकल्यानंतर हा जुना व्हिडीओ बाहेर आला असून, नेटिझन्सनी यावरून त्यांना प्रचंड ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. “काहीही झाले तरी झुकणार नाही म्हणणारे मोटेगावकर अखेर सीबीआयसमोर झुकले,” अशा आशयाच्या कमेंट्स आणि मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

तपासाला वेग

NEET परीक्षेतील गैरव्यवहार आणि पेपर फुटीच्या तारा महाराष्ट्रातील लातूर आणि नांदेड जिल्ह्यांपर्यंत जोडल्या गेल्याचे समोर आले होते. या प्रकरणात सीबीआयने अत्यंत गुप्तता बाळगत मोटेगावकर यांच्यावर पाळत ठेवली होती आणि पुरेशा पुराव्यांच्या आधारे त्यांना अटक केली. सध्या सीबीआयकडून त्यांची सखोल चौकशी सुरू असून, या पेपर फुटीच्या रॅकेटमध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा शोध पोलीस आणि तपास यंत्रणा घेत आहेत.

कोल्हापुरातील RCC क्लासेसच्या समोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आज आंदोलन करणार आहेत. RCC क्लासच्या बोर्डला काळ फासणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेकडून हे आंदोलन केले जाणार आहे.

Follow Us
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?
आधी शिंदेंकडून मोठ्या गिफ्टच्या चर्चा आता थेट मुख्यंमंत्र्यासोबत... ओम
आधी शिंदेंकडून मोठ्या गिफ्टच्या चर्चा आता थेट मुख्यंमंत्र्यासोबत... ओमराजे CM भेटीत असं काय घडलं?
एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री
एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री... कथित डॉनच्या घरावर छापा
फडणवीसानंतर मुख्यमंत्री कोण? राज्यातील बड्या नेत्याने थेट नावच घेतलं,
फडणवीसानंतर मुख्यमंत्री कोण? राज्यातील बड्या नेत्याने थेट नावच घेतलं, महाजन यांचा पत्ता कट?