मोठी बातमी! राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप, उद्धव ठाकरेंचे नगरसेवक घेणार फडणवीसांची भेट? हालचाली वाढल्या

काही दिवसांपूर्वीच महापालिका निवडणुकींचा निकाला लागला आहे, महापौर पदाच्या आरक्षण सोडतीनंतर आता महापौर पदासाठी सर्वच पक्षांकडून आकड्याची जुळवाजुळव सुरू असतानाच राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप, उद्धव ठाकरेंचे नगरसेवक घेणार फडणवीसांची भेट? हालचाली वाढल्या
uddhav thackeray
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 24, 2026 | 7:44 PM

काही दिवसांपूर्वीच महापालिका निवडणुकीचा निकाल लागला आहे, या निवडणुकीमध्ये भाजपनं मोठं यश मिळवलं, मात्र जरी भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी देखील अशा अनेक महापालिका आहेत, जिथे भाजपला सत्ता स्थापनेसाठी आपल्या मित्र पक्षांची गरज लागणार आहे,  त्यामुळे आता महापौरपदाच्या आरक्षण सोडतीनंतर आकड्याची जुळवाजुळव सुरू झाली आहे.  एकीकडे जिथे -जिथे भाजपाचं संख्याबळ जास्त आहे, तिथे भाजप सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे जिथे भाजपचे थोडे कमी नगरसेवक आहेत, तिथे सर्वांनी एकत्र येऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे.

मात्र चंद्रपुरात आता नवा प्रयोग पहायला मिळण्याची शक्यात आहे. चंद्रपुरात काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. त्यामुळे काँग्रेसकडे बहुमतांच्या जवळ जाणारा नगरसेवकांचा आकडा असताना देखील त्यांना सत्ततून बाहेर बसाव लागण्याची शक्यता आहे. चंद्रपुरात शिवसेना ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी आणि अन्य 2 अपक्ष नगरसेवक हे भाजप आणि शिवसेना शिंदे गटासोबत मिळून सत्ता स्थापन करण्याच्या तयारीमध्ये आहेत. शिवसेना ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी आणि दोन अपक्ष नगरसेवक असे दहा नगरसेवक हे  मुंबईकडे रवाना झाले आहेत, हे नगरसेवक आधी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यात आहे. त्यापूर्वी या नगरसेवकांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची देखील भेट घेतली आहे.

काँग्रेसकडून महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष याबाबत कुठलाही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे हे सर्व 10 नगरसेवक आता भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे.  त्यामुळे भाजप, शिवसेना 24 आणि हे 10 नगरसेवक मिळून मॅजिक फिगर असलेला 34 चा आकडा गाठला जाणार आहे. त्यामुळे आता चंद्रपुरात नेमका कोणाचा महापौर होणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच या महापालिकेसाठी शिवसेना ठाकरे गट, भाजप आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती होणार का हे देखील पहावं लागेल.