
आजच्या काळात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. तर दुसरीकडे मात्र सासरच्या जाचाला कंटाळून नवीनच लग्न झालेल्या महिला स्वतःचं आयुष्य संपवत आहे. पुणे येथील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताज असताना पुन्हा एका महिलेने स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. सासरच्या जाचाला कंटाळून अमृता गुरवने मृत्यूला कवटाळलं आहे. सांगली जिल्ह्यातील इश्वरपूर येथे राहणाऱ्या अमृता गुरव हिने सासरच्या जाचामुळे स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. विष प्राशन करुन तिने आत्महत्या केल्याची माहिती समोर ये आहे.
अमृता गुरव हिच्या आत्महत्याचे माहिती पोलिसांनी कळल्यानंतर पोलिसांनी पती ऋषिकेश गुरव, सासू अनुपमा गुरव, सासरा मधुकर गुरव आणि नणंद ऋतुजा गुरव यांना अटक केली आहे. मुलीच्या आत्महत्येनंतर अमृताची आई वंदना कोले यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. मिळालेल्या माहितीनुसार, अमृता हिने वर्षभरापूर्वी कुटुंबियांच्या विरोधात ऋषिकेश याच्यासोबत लग्न केलं होतं.
26 डिसेंबर 2024 मध्ये अमृता हिने कुटुंबियांच्या विरोधात ऋषिकेश याच्यासोबत लग्न केलं. पण लग्नाच्या काही महिन्यांनंतर अमृता हिचा छळ करण्यास सासरच्या मंडळींनी सुरुवात केली… सासू अनुपमा हिच्या आजारपणासाठी माहेरहून तब्बल दोन लाख रुपये आण.. असा दबाव अमृता हिच्यावर सतत टाकण्यात आला… तिला मारहाण करुन मानसिक छळ करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
पती ऋषिकेश पत्नी अमृता हिला मारहाण करायचा… तर सासू आणि नणंद सतत अमृता हिचा अपमान करीत होत्या.. ‘तू अमृताला सोडून दे… आपल्या जातीतील मुलीसोबत तुझं लग्न करु…’, असं ऋषिकेश याचा माना नंदकिशोर म्हणायचा… पोलिसांनी मामाला देखील अटक केली आहे. आता पोलिस याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत.
मिळालेल्या महितीनुसार, अमृताच्या आत्महत्येनंतर तिच्या आई आल्या होत्या. मुलीचा मृतदेह पाहिल्यानंतर आई – वडिलांनी हंबरडा फोडला. आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सांगायचं झालं तर, देश आता प्रगतीपथावर आहे… असं सांगितलं जातं. पण महिलांसाठी सुरक्षित वातावरण कुठे आहे…? हा एक मोठा प्रश्न आहे. रोज कुठे ना कुठे महिलांवर बलात्कार होत आहे. लहान मुलींपासून वृद्ध महिलांवर अत्याचार झाल्याच्या अनेक घटना देखील समोर आल्या आहेत. तर, अनेक ठिकाणी सासरच्या जाचाला कंटाळून महिला आत्महत्या करत आहे… ही देशातील सर्वात मोठी समस्या आहे.