AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nida Khan : निदा खान प्रकरणात एमआयएमचा नगरसेवक बाराच्या भावात… पोलिसांनी निदाला पकडताच थेट… काय घडलं कोर्टात जाण्यापूर्वी?

टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला अखेर अटक करण्यात आली असून, तिच्यासोबत एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांनाही सहआरोपी केले आहे. पटेल यांनी निदाला आश्रय दिल्याचे निष्पन्न झाले आहे, यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नाशिक आणि छत्रपती संभाजी नगर पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईनंतर आता निदा खानला कोर्टात हजर केले जाणार आहे.

Nida Khan : निदा खान प्रकरणात एमआयएमचा नगरसेवक बाराच्या भावात... पोलिसांनी निदाला पकडताच थेट... काय घडलं कोर्टात जाण्यापूर्वी?
निदा खान
| Updated on: May 08, 2026 | 3:02 PM
Share

टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान हिला अखेर छत्रपती संभाजी नगरमधून अटक करण्यात आली आहे. गेले 25 दिवस निदा खान पोलिसांना गुंगारा देऊन लपली होती. कोर्टाने तिचा जामीन नाकारल्यानंतर अखेर पोलिसांनी तिला शोधून काढले. तिच्यासोबत पाच जणांनाही अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात एमआयएमच्या नगरसेवकाचे बारा वाजले आहेत. पोलिसांनी एमआयएमच्या नगरसेवकाला सहआरोपी केलं आहे. निदा खानला आश्रय दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली असून आता एमआयएम हा पक्ष सत्ताधारी आणि विरोधकांच्या टार्गेटवर आला आहे.

निदा खानच्या अटकेनंतर नाशिक पोलिसांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. निदा खानला आश्रय देणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकालाही सहआरोपी केलं आहे, अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली आहे. एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल याने निदाला आश्रय दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

आश्रय दिल्याचं उघड

निदा खानला अटक करण्यासाठी नाशिक शहर आणि छत्रपती संभाजी नगर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. निदा खान हिला छत्रपती संभाजी नगरच्या नरेगाव परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. नरेगाव परिसरातील स्थानिक नगरसेवक मतीन मजीत पटेल यांनी आश्रय दिल्याचं निष्पन्न झालं आहे. पटेल यांना या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. या कारवाईत आम्हाला सहकार्य केल्याबद्दल छत्रपती संभाजी नगर पोलीस आयुक्तांचे आभार मानतो, असं संदीप कर्णिक यांनी म्हटलं आहे.

कोर्टात हजर करणार

दरम्यान, निदा खानला 3 वाजता नाशिक कोर्टात हजर करणार आहेत. सरकारी वकिलांकडून निदाची पोलिस कोठडी मागितली जाणार आहे. एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल याच्या सहभागा बाबत नाशिक पोलिस कोर्टात माहिती देणार आहे. यापूर्वी या प्रकरणात 7 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. निदा खानच्या अटकेनंतर टीसीएस प्रकरणातील सर्व आरोपी आता गजाआड झाले आहेत. आता निदा खानला कोर्टात हजर केल्यावर कोर्ट काय निर्णय देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?