AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता सहन नाही करणार.. परळच्या राड्यात जखमी झालेल्या सागरला भेटल्यानंतर निलेश राणेंकडून वॉर्निंग

ईदच्या मिरवणुकीदरम्यान बुधवारी रात्री परळ परिसरात राडा झाला होता. या घटनेत जखमी झालेल्या तरुणाची निलेश राणे यांनी भेट घेतली आहे. यावेळी बोलताना त्यांनी काही गंभीर आरोप देखील केले आहेत.

आता सहन नाही करणार.. परळच्या राड्यात जखमी झालेल्या सागरला भेटल्यानंतर निलेश राणेंकडून वॉर्निंग
Nilesh RaneImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 28, 2026 | 9:23 PM
Share

ईदच्या मिरवणुकीदरम्यान बुधवारी रात्री परळ परिसरात राडा झाला होता. मशीद परिसरात दुचाकीस्वार हॉर्न वाजवत असल्याने त्यावर स्थानिकांनी आक्षेप घेतला. त्यानंतर दोन गटात राडा झाला. या प्रकरणात पोलिसांनी मध्यस्थी केली, तणावाचं वातावरण निर्माण झालं. या ठिकाणी पोलिसांना सौम्य बळाचा देखील वापार करावा लागला. दरम्यान या घटनेत डोक्याला लोखंडी सळई लागल्याने सागर अनिल देवगडकर हा तरुण गंभीर जखमी झाला होता. या तरुणाची आता शिवसेना शिंदे गटाचे नेते निलेश राणे यांनी भेट घेतली आहे. शिवसेना संपूर्ण ताकदीने पाठिशी उभी आहे, असं अश्वासन देखील त्यांनी यावेळी पीडित तरुणाला दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले निलेश राणे?

गणपती आगमनाच्या वेळी आणि उत्सवाच्या काळात काही टवाळखोर आणि समाज कंटक हे वस्त्यांमध्ये घुसून वातावरण बिघडवण्याचा पूर्वनियोजित कट रचत असल्याचा आरोप यावेळी निलेश राणे यांनी केला आहे. लालबाग आणि भायखळा परिसरातील घटनेनंतर सुरक्षेत त्रुटी राहिल्याचा दावा करत, दोषींवर कडक कारवाई करण्याऐवजी पोलीस स्थानिकांवरच अन्याय करत असल्याचंही ते यावेळी म्हणाले, दरम्यान याप्रकरणी आगामी अधिवेशनात आपण आवाज उठवणार आहोत, असा इशाराही राणे यांनी यावेळी दिला आहे. ​ घटनेदरम्यान पोलीस कर्मचारी आणि महिलांबद्दल अपशब्द वापरण्यात आले. मात्र तरी देखील केवळ मोजक्याच लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत.​ सण-उत्सवांमध्ये आणली जाणारी विघ्ने आणि देवाची होणारी विटंबना आता सहन केली जाणार नाही, पोलिसांनी वेळीच योग्य ती कारवाई न केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल असा थेट इशारा यावेळी निलेश राणे यांनी दिला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

ईदच्या मिरवणुकीदरम्यान बुधवारी रात्री परळ परिसरात ही घटना घडली आहे. मशीद परिसरात दुचाकीस्वार हॉर्न वाजवत असल्याचा आरोप करून स्थानिकांनी त्यावर आक्षेप घेतला. यावरून वाद वाढला, वादाचं रूपांतर राड्यात झालं. या घटनेत सळई लागल्याने सागर अनिल देवगडकर हा तरुण गंभीर जखमी झाला होता.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ