ठाकरे गटाला नाशिकमध्ये सर्वात मोठं भगदाड, बड्या नेत्याची सोडचिठ्ठी; एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेश

नाशिकच्या माजी आमदार आणि उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या निर्मला गावित यांनी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. गावित यांचा प्रवेश हा येणाऱ्या महापालिका निवडणुकांपूर्वीचा महत्त्वाचा राजकीय बदल आहे.

ठाकरे गटाला नाशिकमध्ये सर्वात मोठं भगदाड, बड्या नेत्याची सोडचिठ्ठी; एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेश
ठाकरे गटाला सर्वात मोठं भगदाड
Image Credit source: social media
| Updated on: May 28, 2025 | 1:10 PM

येत्या सप्टेंबर महिन्यात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. महापालिका जिंकण्यासाठी नवनवीन डावपेच आखले जात आहेत. असं असतानाच दुसरीकडे मात्र ठाकरे गटाला आज मोठा धक्का बसला आहे. नाशिकमधील मोठं प्रस्थ आणि ठाकरे गटाच्या माजी आमदार निर्मला गावित यांनी उद्धव ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला आहे. निर्मला गावित यांनी ठाकरे गटाला रामराम केल्याने नाशिकमधील समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.

नाशिक जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या निर्मला गावित या शिंदे गटात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गावित यांचा शिंदे गटात प्रवेश केला. शिंदेंच्या शिवसेनेत मोठी इन्कमिंग सुरू आहे. जिल्हा परिषद शालेय पोषण आहार महिला कर्मचारीही आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत एक हजार महिलाही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

शिंदेंमुळेच शिवसेनेत आले

यावेळी निर्मला गावित यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपला प्रवेश संपन्न होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मी 2019 ला शिवसेनेत आले होते. आता नेतृत्व बदललं आहे. पक्ष शिवसेनाच आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तालुक्याच्या प्रश्नांना हात घालण्यासाठी मोलाचं मार्गदर्शन असू द्या. आजपासूनच मी कामाला लागणार आहे, असं निर्मला गावित म्हणाल्या.

तुम्ही वेगळे नाहीत

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भाषण केलं. सगळ्या लाडक्या बहिणींना शुभेच्छा. बहिणी मोठ्या संख्येने दिसत आहेत. भाऊ कमी आहेत. आधी एक दराडे आले. मग मी म्हणालो, राम आलाय लक्ष्मण कुठे आहे? म्हणून मग लक्ष्मणला पण आणलं. निर्मला गावित यांचे स्वागत, असं एकनाथ शिंदे म्हणाले. हे आनंद दिघे यांचे ठाणे आहे. लाडकी बहीण योजन कधीच बंद होणार नाही. विरोधकांचा तुम्ही सुफडा साफ केला. सर्व मागण्या गोरगरिबांच्या आहेत. सरकार गोरगरिबांचे आहे. सरकार आणि तुम्ही वेगळे नाहीत, असंही शिंदे म्हणाले.

कोण आहेत निर्मला गावित?

निर्मला गावित या मूळच्या काँग्रेसवासी आहेत. त्यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून झाली आहे. त्या ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत माणिकराव गावित यांच्या कन्या आहेत. निर्मला गावित या दोनवेळा आमदार राहिल्या आहेत. 2019मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता.