Nitesh Rane : भाजपं सोडून आले तर वेलकम ब्रो, या रोहित पवारांच्या ऑफरवर नितेश राणेंचं उत्तर

Nitesh Rane : "या समितीकडून ज्या सूचना आणि शिफारसी प्राप्त होतील, त्यानुसार मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. भविष्यात MPSCच्या संदर्भात विद्यार्थ्यांच्या मनात कोणतीही अनिश्चितता किंवा चिंता राहू नये आणि त्यांच्या भविष्याला योग्य दिशा मिळावी, हा सरकारचा प्रयत्न असला पाहिजे"

Nitesh Rane : भाजपं सोडून आले तर वेलकम ब्रो, या रोहित पवारांच्या ऑफरवर नितेश राणेंचं उत्तर
Nitesh Rane-Rohit Pawar
| Updated on: Oct 05, 2026 | 10:23 AM

MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी रोहित पवार सातत्याने आवाज उठवतायत. नितेश राणे म्हणाले की, रोहित पवारांना मी शत्रू मानत नाही. ते विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर काम करताय ते मंत्रिमंडळात सहकारी म्हणून दिसू शकतात. त्यावर उत्तर देताना रोहित पवार म्हणाले की, “नितीश भाऊ भाजपमध्ये राहणार नाहीत. ते भाजपं सोडतील. आमच्यासोबत आले तर आपण एकत्र मंत्री म्हणून राहू शकतो. जे पूर्वी काँग्रेसमध्ये होते ते भाजपत गेले. त्यांना त्यांनी केलेल्या चुकांची जाणीव झालीय. भाजपं सोडून आले तर वेलकम ब्रो” यावर आता नितेश राणे यांनी उत्तर दिलय. ‘माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी इथेच आहे आणि माझी भूमिका स्पष्ट आहे’ “इकडे-तिकडेची भाषा करून वेळ मारून नेण्यापेक्षा तुम्हाला जर वेळ आणि तारीख माहिती असेल, तर ती स्पष्टपणे सांगून टाका. मला वाटतं, भारतीय जनता पक्षाला अशा धमक्यांनी काहीही फरक पडणार नाही” असं नितेश राणे म्हणाले.

“उगाच माझ्याबद्दल इकडच्या-तिकडच्या गोष्टी करण्यापेक्षा तुम्हाला माहिती असलेली वेळ आणि तारीख जाहीर करा. कारण तुम्ही सत्तेत आलात, मंत्री झालात, तर संबंधित अध्यक्षांना हटवण्यासाठी नेमकी काय प्रक्रिया करावी लागते, हे तुम्हालाही कळेल.त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना आणखी चांगल्या पद्धतीने मदत कशी करता येईल, त्यांना न्याय कसा देता येईल, हेही तुम्हाला समजेल. त्यामुळे माझ्याबद्दल उगाच अंदाज बांधण्यापेक्षा आणि इकडच्या-तिकडच्या भाषा करण्यापेक्षा तुम्हाला माहिती असलेली वेळ आणि तारीख थेट सांगून टाका” असं नितेश राणे म्हणाले.

Loading...

राधा मॅडम आणि रामस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सक्षम समिती स्थापन

सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड म्हणाले की, शैलेंद्र देवळाणकर आहेत काही लोकांनी पेपर फोडले हजार दीड हजार कोटी कमावले असा आरोप केलाय. त्यावर नितेश राणे बोलले. “हा विषय विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रश्नाकडे राजकीय दृष्टिकोनातून न पाहता विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे.विद्यार्थ्यांच्या हितासाठी जे आवश्यक आहे, ते करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सचिवांची तात्काळ बदली करून, वी. राधा मॅडम आणि रामस्वामी जी यांच्या मार्गदर्शनाखाली सक्षम समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सध्या MPSCच्या संदर्भातील संपूर्ण विषयाचा अभ्यास करत आहे” असं नितेश राणे म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us