AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असं भाषण केलं तर चिरफाड…! मटणाचा वाद पेटला; सुप्रिया सुळेंच्या विधानावर नितेश राणे संतापले

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे मटण खाण्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. मी मटण खाल्लं तर माझ्या पांडुरंगाला चालतं असं सुळे यांनी म्हटलं होतं.यावर आता नितेश राणेंनी भाष्य केलं आहे.

असं भाषण केलं तर चिरफाड...! मटणाचा वाद पेटला; सुप्रिया सुळेंच्या विधानावर नितेश राणे संतापले
Sule and Rane
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 24, 2025 | 4:33 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे मटण खाण्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. मी मटण खाल्लं तर माझ्या पांडुरंगाला चालतं असं सुळे यांनी म्हटलं होतं. यामुळे आता वाद निर्माण झाला आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी यावर भाष्य करत संताप व्यक्त केला आहे. नितेश राणे नेमकं काय म्हणाले ते सविस्तर जाणून घेऊयात.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?

सुप्रिया सुळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना बोलताना मटण खाण्याबाबत म्हटले होते की, ‘मी रामकृष्ण हरीवाली आहे. फक्त माळ घालत नाही, कारण कधी कधी मटण खाते. मी त्यांच्या सारखी खोटं बोलत नाही. खाल्लं तर माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? माझे आई वडील, सासू सासरे, नवरा खातो, आमच्या पैशाने खातो आपण कोणाला मिंदे नाही, जे आहे डंके की चोट पर आहे, दिलं खोल कर चलो. खाते तर खाते खाल्लं तर काय पाप केलं काय? मी नॉनव्हेज खाते, फक्त माळ घालत नाही, त्यामुळे अजून मोह होतो. ज्या दिवशी माळ घालेल त्या दिवशी मटण खाणं सोडून दिलं असे समजा.’

नितेश राणेंचे प्रत्युत्तर

यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, हिंदू धर्माची हीच विशालता आहे. कोणी मटण मासे खावे कोणाची कसली बंदी नाही. सुप्रिया सुळे सातही दिवस मटण खात असल्या तरी तो त्यांचा प्रश्न आहे. सुप्रियाताई लव जिहादच स्वागत करतात. त्या हिंदू धर्म पांडुरंगाच्या बाबतीत कोणाला खुश करायचा प्रयत्न करतात, हे जगजाहीर आहे.

दुसऱ्या धर्मासाठी अशी भाषण केलं तर चिरफाड होईल – राणे

पुढे बोलताना राणे यांनी, ‘आमच्या मंदिरात जाताना अशा पद्धतीने अपमानित शब्द वापर असतील तर वारकरी सांप्रादयासह प्रत्येकाने रोष व्यक्त केला पाहिजे. हिंदू धर्मासारखं त्यांनी इतर धर्म साठी असं काही बोलून किंवा करून दाखवावं. दुसऱ्या धर्मासाठी अशी भाषण केलं तर चिरफाड होईल. ही मस्ती फक्त आमच्या हिंदू धर्माबद्दल बोलताना होते, त्यांनी ही मस्ती करू नये असं विधान केलं आहे.

Follow Us
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?