AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitin Gadkari : बायको जर ठीक नसेल, तर….; भरमंचावरून मोलकरीण म्हणत नितीन गडकरी खूप काही बोलून गेले

बायको जर ठीक नसल्यास पुरुष व्यक्ती राजकारण, व्यवसायात यशस्वी होऊ शकत नाही, असे वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे. नितीन गडकरी यांच्या विधानाची जोरदार चर्चा होत आहे.

Nitin Gadkari : बायको जर ठीक नसेल, तर....; भरमंचावरून मोलकरीण म्हणत नितीन गडकरी खूप काही बोलून गेले
nitin gadkari newsImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 21, 2026 | 9:14 AM
Share

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. राजकीय व्यासपीठ असो सांस्कृतिक व्यासपीठावरून नितीन गडकरी यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत असते. काही दिवसांपूर्वी रेड लाइट एरियातून सर्वाधिक मते मिळाल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता थेट बायकोवर टिप्पणी केली आहे. ‘बायको जर ठीक नसेल तर माणूस कितीही कर्तृत्वान असो,तो राजकारणात,समाजकारणात आणि व्यवसायात यशस्वी होऊ शकत नाही, असं विधान केंद्रीय नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते नागपुरात बोलत होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात एका वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. माजी आमदार अनिल सोले यांच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला गडकरींनी हजेरी लावली. या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सोले यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. त्यानंतर ‘अविरत कार्यरत : प्रा. अनिल सोले’ या गौरवग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. पुढे या कार्यक्रमात गडकरींनी उपस्थितांना संबोधित केलं. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, ‘माझे लग्न झाले त्यावेळी माझ्याकडे शंभर-दीडशे कप चहा व्हायचा, यावर माझ्या बायकोने विचारले की, मला बायको म्हणून आणले की मोलकरीण म्हणून? सामाजिक-राजकीय जीवन जगताना घरच्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. मुलं चांगले निघाले, मुलांवर संस्कार चांगले झाले, मी काहीच पाहत नाही,मात्र त्यांनी पाहिले नसते तर चिंधड्याच झाल्या असत्या. एखाद्या व्यक्तीच्या यशामागे स्त्रीचे कर्तृत्व असते, असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्त्री कर्तृत्व अधोरेखित केले.

रेड लाइट एरियावर गडकरी काय म्हणाले होते?

काही दिवसांपू्र्वी गडकरींनी रेड लाइट एरियावर मोठं वक्तव्य केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, मागील निवडणुकीत सुशिक्षित भागांपेक्षा क्रिमिनल, अंडरवर्ल्ड आणि रेड लाईट एरियातून अधिक मतदान झालं. सुशिक्षित लोकांनी 70 ते 75 टक्के मतदान केलं असेल. परंतु गुन्हेगारी आणि अंडरवर्ल्डशी संबंधित भागातून 92 टक्के मतं मिळाली. आता याचा अर्थ संबंधित लोकांशी आपले संबंध आहेत, असा अर्थ काढू नये. या भागांत रस्ते आणि सामाजिक कामे केली आहेत. त्यामुळे तेथील लोकांनी मला मतदान केले, असं त्यांनी सांगितलं होतं.

Follow Us
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन..
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन मुश्रीफ स्पष्टच म्हणाले...
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज..
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी...
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी करणार सण
MPSC गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मुदत, प्रतिज्ञापत
MPSC गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मुदत, प्रतिज्ञापत्रांबाबत नेमकं काय म्हणाले तुकाराम मुंढे?
ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद,
ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद, नेमकं काय घडलं होतं?
अखेर TCS धर्मांतर प्रकरणी मोठी अपडेट समोर! एसआयटीच्या तपासानंतर थेट..
अखेर TCS धर्मांतर प्रकरणी मोठी अपडेट समोर! एसआयटीच्या तपासानंतर थेट कारवाई
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! यंदा साखर उत्पादनाचे आकडे जाहीर करण्यास...
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! यंदा साखर उत्पादनाचे आकडे जाहीर करण्यास बंदी; मोठं कारण समोर?
दिल्लीतील अटकेनंतर CJP चा पहिलाच मोठा एल्गार; 7 नोव्हेंबरला आंदोलन
दिल्लीतील अटकेनंतर CJP चा पहिलाच मोठा एल्गार; 7 नोव्हेंबरला आंदोलन!
प्रफुल पटेल शरद पवारांच्या भेटीला; भेटीच्या निमित्ताने...
Praful Patel Met Sharad Pawar : प्रफुल पटेल शरद पवारांच्या भेटीला; भेटीच्या निमित्ताने...
बीडच्या साडीची जाहिरात करण्यासाठी पंकजा मुंडे रॅम्प वॉक करणार; नेमकं..
Pankaja Munde : बीडच्या साडीची जाहिरात करण्यासाठी पंकजा मुंडे रॅम्प वॉक करणार; नेमकं काय म्हणाल्या?