
राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीचीही घोषणा झाली आहे. यात नाशिक महानगर पालिकेच्या निवडणुकीचाही समावेश आहे. या निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे, तसेच 16 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. आपण लेखात प्रभाग क्रमांक 9 आणि 10 ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या प्रभागांमध्ये कोणता भाग येतो? याची लोकसंख्या किती आहे? गेल्या निवडणुकीत कोणी बाजी मारली होती हे आपण जाणून घेणार आहोत.
प्रभाग क्रमांक ९ मध्ये प्रामुख्याने सातपूर परिसर आणि त्यालगतचा भाग येतो. यात अशोक नगर, सातपूर कॉलनी, कार्बन नाका परिसर आणि काही औद्योगिक वसाहतींचा समावेश होतो. नवीन प्रभाग रचनेनुसार, नाशिकमधील प्रभागांची सरासरी लोकसंख्या 35 ते 45 हजारांच्या दरम्यान आहे. 2011 च्या जनगणनेच्या आधारे तयार केलेल्या प्रारूप आराखड्यानुसार प्रभाग 9 ची लोकसंख्या 40 ते 45 हजार इतकी आहे. 2017 च्या निवडणुकीत या प्रभागातून गोविंद धिवरे, हेमलता कांडेकर, वर्षा भालेराव, दिनकर पाटील हे भाजपचे चारही उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे हा प्रभाग भाजपचा गड मानला जातो.
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
हा प्रभाग सिडको विभागात येतो. यात प्रामुख्याने सिडकोमधील पवन नगर, उत्तमनगर आणि प्रबुद्ध नगर यांसारख्या दाट लोकवस्तीच्या भागांचा समावेश होतो. प्रभाग क्रमांक 10 ची लोकसंख्या साधारणपणे 38000 ते 42000 च्या दरम्यान आहे. सिडको परिसर असल्याने या प्रभागात नागरी सुविधा आणि नियोजित वसाहतींचे प्रमाण जास्त आहे. या प्रभागातून गेल्या निवडणुकीत माधुरी बोलकर, पल्लवी पाटील, शशिकांत जाधव, सुदाम नागरे या भाजपच्या चारही उमेदवारांनी विजय मिळवला होता.
प्रभाग क्रमांक 9 आणि 10 मध्ये भाजपचे वर्चस्व पहायला मिळाले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत गड राखण्याचे आव्हान भाजपसमोर असणार आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर काम करावे लागणार आहे. इतर पक्षांचासाठी भाजपचा हा गड भेदने आव्हाणात्मक असणार आहे. यासाठी राजकीय पक्षांना सुरूवातीपासून रणनीती आखावी लागणार आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकीत या प्रभागातील लोक कुणाच्या गळ्यात विजयाची माळ टाकतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE