AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhananjay Munde : आर्थिक स्थितीमुळे पोटगी, कौटुंबिक हिंसाचार झालेला नाही – धनंजय मुंडेंचे वकील

धनंजय मुंडे यांच्या वकील सायली सावंत यांनी काही मुद्यांवर प्रकाश टाकला आहे. कोर्टाने काय ऑर्डर दिलीय? त्यात काय म्हटलय? ते धनंजय मुंडे यांच्या वकिल सायली सावंत यांनी स्पष्ट केलय.

Dhananjay Munde : आर्थिक स्थितीमुळे पोटगी, कौटुंबिक हिंसाचार झालेला नाही - धनंजय मुंडेंचे वकील
Dhananjay Munde
| Updated on: Feb 06, 2025 | 2:58 PM
Share

वांद्रे फॅमिली कोर्टाने करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे प्रकरणात एक आदेश दिला आहे. यात मंत्री धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना महिन्याला 2 लाख रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला आहे. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात घरगुती हिंसाचारा कायद्यातंर्गत खटला दाखल केलाा आहे. आता या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या वकील सायली सावंत यांनी काही मुद्यांवर प्रकाश टाकला आहे. कोर्टाने काय ऑर्डर दिलीय? त्यात काय म्हटलय? ते धनंजय मुंडे यांच्या वकिल सायली सावंत यांनी स्पष्ट केलय.

– करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्यातील व्यक्तिगत कौटुंबिक न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याप्रकरणी न्यायालयाने कोणताही कौटुंबिक हिंसाचाराचा निष्कर्ष काढलेला नाही

– मीडियाने जबाबदारीने आणि अचूक वृत्तांकन करावे असं मुंडे यांच्या वकील सायली सावंत यांनी आवाहन केलं आहे.

– आजचा आदेश फक्त अंतरिम देखभालीसाठी रक्कम देणे बाबत इतकाच आहे. जो केवळ आर्थिक निकष लक्षात घेऊन पारित केलेला आहे. कथित हिंसाचाराच्या कोणत्याही आरोपावर आधारित नाही.

– धनंजय मुंडे यांनी स्वतः ते करुण शर्मा व मुले यांच्याबरोबर लिव इनमध्ये असल्याची यापूर्वीच कबुली दिली आहे, तोच या आदेशाचा आधार आहे.

– माध्यमांना विनंती आहे की, जबाबदारीने व अचूक वृत्तांकन करावे आणि आदेशाबाबत कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या खोट्या वृत्ताकनापासून दूर राहावे.

– कोणत्याही मीडियाच्या व्यक्तीला काहीही शंका असल्यास ते रिपोर्टिंग करण्यापूर्वी वकिलांकडून स्पष्टीकरण मागू शकतात आणि असे स्पष्टीकरण देऊनच बातम्या प्रसिद्ध कराव्यात असे आवाहन त्यांनी केले आहे.

– विनाकारण कोणाचीही बदनामी करणारे वृत्त देऊ नये असे आवाहन केले आहे.

Follow Us
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!.
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला.
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य.
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात.
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा.
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल.
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल.
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका.
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप.
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले.