AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उत्तर नागपूर मतदारसंघाचा इतिहास आणि राजकीय स्थिती

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून इच्छूक उमेदवार अर्ज भरताना शक्तीप्रदर्शन करत आहेत. महाराष्ट्रातील अशीच एक उत्तर नागपूर मतदारसंघात चुरशीची लढाई पाहायला मिळते. काँग्रेसकडून पुन्हा एकदा नितीन राऊत रिंगणात आहेत. आता त्यांच्या विरोधात भाजप कोणाला मैदानात उतरवते हे पाहावे लागेल.

उत्तर नागपूर मतदारसंघाचा इतिहास आणि राजकीय स्थिती
| Updated on: Oct 25, 2024 | 8:28 PM
Share

उपराजधानी नागपुरातील उत्तर नागपूर मतदारसंघ हा झोपडपट्ट्यांसाठी अधिक प्रसिद्ध आहे. या मतदारसंघातून कॉंग्रेसने डॉ. नितीन राऊत यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून अद्याप उमेदवारांची घोषणा झालेली नाही. भाजपकडून संदीप जाधव, डॉ. मिलिंद माने आणि अविनाश धमगाये हे इच्छूक आहेत. या निवडणुकीत कॉंग्रेसला संयुक्त रिपाइं, वंचित आणि बसपच्या उमेवाराकडून मत विभाजनाचा मोठा फटका बसण्याची चिन्ह आहेत. उत्तर नागपूर हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघावर कॉंग्रेस, भाजप आणि ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकनेही सत्ता मिळवली आहे. १९७२ मध्ये नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून १ हजार ८५८ मतांनी फॉरवर्ड ब्लॉकचे दौलतराव हुसनजी गणवीर हे विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेसचे गणपत भगत यांना पराभूत केले होते. १९७८ सालच्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या (खोब्रागडे) गटाने विजय मिळवला होता. परंतु १९९० नंतर रिपाइं (खो) ची ताकद येथे कमी होत गेली.

१९७२ पासून येथे झोपडपट्‍ट्यांचे प्रश्न अजूनही कायम आहे. सध्या कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. नितीन राऊत हे या मतदारसंघातून विद्यमान आमदार आहेत. १९९५ साली भाजपचे भोला बढेल या मतदारसंघातून विजयी झाले होते तर १९९९ साली कॉंग्रेसचे नितीन राऊत यांनी विजय मिळवला. २००४ आणि २००९ मध्ये देखील ते विजयी राहिले. मात्र २०१४ मध्ये डॉ. मिलिंद माने यांनी राऊत यांचा पराभव केला. परत २०१९ मध्ये नितीन राऊत विजयी झाले आणि आता पुन्हा ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

या मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या १४ टक्के आहे. त्यानंतर मेशराम २.८ टक्के, पाटील १.३ टक्के, शाहू १.२ टक्के, गजबिये आणि रामटेके मतदारांची संख्या अधिक आहे. येथे पुरुष मतदारांची संख्या १,७४,३४२, महिला मतदारांची संख्या १,६३,७६९ असे एकूण मतदार ३,३८,१२० आहेत.

२०१९ चा निकाल

 उमेदवार पक्ष मतदान
डॉ. नितीन राऊत काँग्रेस 86,821
डॉ. मिलिंद माने भाजपा 66,127
सुरेश भगवान सखरे बसपा 23,333
डोंगरे किर्ती दीपक एआईएमआईएम 9,318

१०१४ चा निकाल

 उमेदवार पक्ष मतदान
डॉ. मिलिंद माने भाजपा 68,905
किशोर उत्तमराव गजभिये बसपा 55,187
डॉ. नितीन राऊत काँग्रेस 50,042

२००९ चा निकाल

 उमेदवार पक्ष मतदान
डॉ. नितीन राऊत काँग्रेस 57,929
तांबे राजेश भाजपा 40,067
डॉ. मिलिंद माने अपक्ष 23,662
धरोंपल उर्फ ​​धर्मकुमार देव पाटील बसपा57,929 13,447
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.