सूडबुद्धीच्या कारवाईला घाबरत नाही, 9 तारखेला गावागावात निदर्शने करणार, रामशेठ ठाकूरांचा इशारा

| Updated on: Aug 03, 2021 | 3:43 PM

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटलांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी करण्यात आलेल्या घेराव आंदोलनावर कारवाई करण्यात आली.

सूडबुद्धीच्या कारवाईला घाबरत नाही, 9 तारखेला गावागावात निदर्शने करणार, रामशेठ ठाकूरांचा इशारा
ramsheth thakur
Follow us on

पनवेल : दि. बा. पाटील यांच्या नावासाठी आग्रह केला म्हणून सुडबुद्धीने कारवाई सुरू आहे. ती कारवाई तात्काळ थांबवण्याची सर्वपक्षीय कृती समितीनं मागणी केलीय. रामशेठ ठाकूर आणि कृती समितीने ठाण्याचे महापौर आणि आयुक्तांना याबाबत निवेदनही दिलेय.

आगरी-कोळी बांधवांच्या घरे, बांधकामांवर सूडबुद्धीने कारवाई

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटलांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी करण्यात आलेल्या घेराव आंदोलनावर कारवाई करण्यात आली. त्यानंतर ठाण्यातील आगरी-कोळी बांधवांच्या घरे, बांधकामांवर तेथील महापालिकेने सूडबुद्धीने कारवाई सुरू केली. पाडकामाची ही कारवाई त्वरित थांबवावी, अशी मागणी लोकनेते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकार्‍यांनी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि आयुक्त विपीन शर्मा यांची सोमवारी भेट घेऊन त्यांच्याकडे केली.

स्थानिकांचा गावठाण विस्ताराचा प्रश्न आजही प्रलंबित

या वेळी कृती समितीच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले की, विकास आणि औद्योगिकीकरणाच्या नावाखाली ठाणे महानगरपालिका हद्दीतील भूमिपुत्रांच्या जमीन अल्प दरात घेऊन तेथे कंपन्या, टाऊन्स उभी राहिलेली आहेत. मात्र स्थानिकांचा गावठाण विस्ताराचा प्रश्न आजही प्रलंबित आहे. सध्या स्थानिकांना शेती नाही, घरे नाही, नोकरी नाही, व्यवसाय नाही. अशी परिस्थिती असताना केवळ लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी झाल्याने आकसापोटी येथील आगरी-कोळी लोकांच्या घरांवर ती अनधिकृत आहेत, असे सांगून महापालिका कारवाई करीत आहे, असंही कृती समितीनं सांगितले.

एकाला एक न्याय आणि दुसर्‍याला वेगळा असे का?

बेकायदा बांधकामांना आमचा पाठिंबा नाही, पण ठाण्यात अशी अनेक अनधिकृत बांधकामे आढळून येतात. त्यांना मात्र अभय दिले जाते. एवढेच नव्हे तर काही बड्या मंडळींची अनधिकृत बांधकामे दंड आकारून नियमित केली जातात. मग एकाला एक न्याय आणि दुसर्‍याला वेगळा असे का? जाणीवपूर्वक सुडबुद्धीने ही कारवाई सुरू करण्यात आली आहे, असा आरोपही कृती समितीनं केलाय.

ठाण्यातील स्थानिक लोक बेकारीचे जीवन जगतायत

ठाण्यातील स्थानिक लोक बेकारीचे जीवन जगत आहेत. त्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे सोडून केवळ आंदोलनात सहभागी झाल्याने त्यांच्यावर महापालिकेने कारवाईचे सत्र सुरू केले आहे. त्याचा आम्ही निषेध करतो असे सांगून ही कारवाई ताबडतोब थांबविण्यात यावी, अशी मागणी महापौर आणि आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी कृती समितीच्या पदाधिकार्‍यांनी ठाण्यात पाहणी करून आढावाही घेतला.

लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळात अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार जगन्नाथ पाटील, सहचिटणीस दीपक म्हात्रे, खजिनदार जे. डी. तांडेल, पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड, नगरसेवक विजय चिपळेकर, राजेश गायकर, सदस्य गुलाब वझे, संतोष केणे, दशरथ भगत, अर्जुनबुवा चौधरी, गंगाराम शेलार, भाजपचे ठाणे शहर उपाध्यक्ष डॉ. राजेश मढवी, जिल्हा सरचिटणीस नीता पाटील, झोपडपट्टी सेल महिला अध्यक्ष उषा पाटील, ओबीसी सेल दिवा मंडल अध्यक्ष रोहिदास मुंडे, मोतीराम गोंधळी आदींचा समावेश होता.

संबंधित बातम्या :

नवी मुंबई विमानतळाच्या नावाचा वाद आता विधानभवनाच्या दारात; वसंतराव नाईकांचे नाव देण्यासाठी निदर्शने

नवी मुंबई विमानतळ नामकरण वाद : बाळासाहेबांचे नाव देणे हा उद्धव ठाकरेंचा बालहट्ट, त्यांना स्थानिकांबद्दल अजिबात आस्था नाही : भाजप

Not afraid of retaliatory action, will protest in villages on 9th august, Ramsheth Thakur warns