आता मिळणार ‘ऑनलाईन अंत्यविधी पास’; गैरसोय टाळण्यासाठी पुणे महापालिकेचा निर्णय

महानगरपालिकेनं आता 'ऑनलाईन अंत्यविधी पास' ची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. मृत रुग्णांच्या नातेवाईकांना अंत्यविधी पाससाठी ताटकळत राहावं लागू नये. जलद गतीनं पासची उपलब्धता व्हावी,यासाठी ही सुविधा निर्माण केली आहे.

आता मिळणार 'ऑनलाईन अंत्यविधी पास'; गैरसोय टाळण्यासाठी पुणे महापालिकेचा निर्णय
पुणे महानगरपालिका
Follow us
| Updated on: Nov 18, 2021 | 11:50 AM

पुणे- कोरोनामुळं शहरातील मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या मृत्यूच्या प्रमाणामुळं महानगरपालिकेनं आता ‘ऑनलाईन अंत्यविधी पास’ ची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. मृत रुग्णांच्या नातेवाईकांना अंत्यविधी पाससाठी ताटकळत राहावं लागू नये. जलद गतीनं पासची उपलब्धता व्हावी,यासाठी ही सुविधा निर्माण केली आहे. कोरोना काळात नागरिकांना ऑनलाईन अंत्यविधी पासची सुविधा उपलब्ध करून दिली होती. मात्र यापुढं ही सुविधा कायम करण्याचा निर्णय महानगरपालिकेनं घेतला आहे.

”मृत्यूचा दाखल व अंत्यविधीचे पासेस ऑनलाईन देत महापालिकेच्या यंत्रणेमध्ये आणखी सुटसुटीतपणा आणण्यासाठी ही सुविधा निर्माण केल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली आहे.”

जन्म-मृत्यूचे दाखले मिळतात ऑनलाईन महानगरपालिकेने यापूर्वी नागरिकांच्या सोयीसाठी जन्म – मृत्यूचे दाखले ऑनलाईन देण्याची सुविधा निर्माण केली आहे. त्यानंतर आता ‘अंत्यविधीसाठी ऑनलाईन पास’ ची सुविधा कायम स्वरूपी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं रुग्णाच्या मृत्यूनंतर रुग्णाच्या नातेवाईकाला आता महापालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करत ऑनलाईन पास मिळवता येणार आहे. संकेतस्थळावरून काढलेला पास स्मशान भूमीतील अधिकृत कर्मचाऱ्याला दाखवा लागेल. त्यांनंतर संबंधित कर्मचारी त्याची संकेतस्थळावर खातरजमा करेल व अंत्यविधीस परवानगी देईल. यासुविधेमुळं रुग्णांच्या नातेवाईकांची रात्री अपरात्री होणारी धावपळ थांबणार आहे.

सद्यस्थिती काय आहे.

सद्यस्थितीला महानगरपालिका , पालिका रुग्णालये व क्षेत्रीय कार्यालयातून अंत्यविधीचे पास उपलब्ध करून दिले जातात. त्यानंतर याच्या नोंदी कसबा पेठीतील जन्म -मृत्यू कार्यालयाकडे जातात. यासगळ्यासाठी साधारण 21दिवसांचा कालावधी लागतो. अनेकदा रुग्णाचा रात्री मृत्यू झाला तर नातेवाईकांना अंत्यविधी पासेससाठी रात्रीच्या वेळी महापालिका कार्यालय, क्षेत्रीय कार्यालयात खेटे मारावे लागतात. याबरोबर मृत व्यक्तींच्या आधारकार्ड, ओळखपत्राच्या झेरॉक्स मागितल्या जातात. रात्रीची वेळ असेल तर झरॉक्स मिळणे अवघड होऊन जाते व नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागतो. प्रक्रियेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे .

स्मशानभूमी व दफनभूमीची होणार स्वच्छता शहरात ठिकठिकाणी स्मशानभूमी व दफन भूमीची सुविधा आहे. शहरातीला सर्वात मोठ्या वैकुंठ स्मशानभूमीत लवकरच सार्वाजनिक स्वच्छता व सुरक्षेच्या संदर्भात महत्त्वाची पावले उचलली जाणार आहे , इतर ठिकाणच्या स्मशानभूमी व दफनभूमीची पाहणी करत, आवश्यकती डागडुजी केली जाणार असल्याची माहितीहीअतिरिक्त आयुक्त डॉ. खेमनार यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

झूठ बोले कौआ काटे, भाजपच्या काळात दंगली झाल्याच नाहीत, अनिल बोंडे खोटं बोलत असल्याचा मलिक यांचा आरोप

फेसबुकवरील मैत्री महागात, नगरमध्ये सरकारी कर्मचाऱ्याची 2 लाख 30 हजारांना फसवणूक

भाजपकडून अमरिश पटेल विधान परिषदेच्या रिंगणात; निवडणुकीची चुरस वाढणार?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.