
कुणाल जायकर, अहमदनगर, दि.4 फेब्रुवारी 2024 | राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ओबीसी एल्गार मेळाव्यात चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सोडले नाही. भुजबळ म्हणाले होते की, मुख्यमंत्र्यांनी सांगितले माझी शपथ पूर्ण झाली. मराठा समाजाला आरक्षण मिळालंय. मराठा समाजाला आरक्षण मिळाले तर मग सर्व्हेक्षण कशासाठी करत आहात? असा संतप्त सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे. त्यानंतर मराठा समाजातील लोकांची दाढी करु नका, असे भुजबळ यांनी म्हटले.
एल्गार सभेत बोलताना भुजबळ म्हणाले की, न्हावी समाजातील एका व्यक्तीने ओबीसी आरक्षणासंदर्भात पोस्ट टाकली होती. त्यामुळे मराठा समाज संतप्त झाला. त्यांनी त्या व्यक्तीच्या दुकानात न जाण्याचा निर्णय घेतला. मराठा समाज जर असे तुम्हाला बायपास करत असतील तर सर्व न्हाव्यांनी एकही मराठ्याची हजामत करु नका. त्यांना आपआपसात भादरु द्या. सागेसोयरेबाबत खोटे दाखले दिले जात आहे. प्रमाणपत्रावर खाडाखोड करण्याचे प्रकार होत आहे.
तुमची लायकी काय हे विचारत आहेत. मात्र आजपर्यंत अनेक रत्ने ओबीसींनी दिली आहेत. त्यांनी 27 तारखेला गुलाल उधळला आहे. मग आता पुन्हा उपोषण कशाला? अद्यादेश आणि मसुदा यातील फरक यांना माहीत नाही. मराठा समाजास आरक्षण दिल्याचे सांगितले मग आता ओबीसी आयोगाकडून सर्वेक्षण कशासाठी करता आहात. मराठा समाज्याला आरक्षण मिळाला पाहिजे आमचा विरोध नाही, मात्र आमच्या ताटातले घेऊ नका , असे भुजबळ यांनी म्हटले.
दाव पर सबकुछ लगा है…असे म्हणत भुजबळ यांनी सर्वांना आता एकत्र यावे लागणार असल्याचे म्हटले आहे.
सध्या काही ओबीसी नेते देखील घाबरत आहे. मात्र आमच्या सोबत 70 टक्के समाज आहे, असे त्यांनी म्हटले.
हे ही वाचा
मग आम्ही दाढी घरीच करु, त्यांना गोर गरीबांना उपाशी मारायचंय… मनोज जरांगे यांचा भुजबळांवर पलटवार